Introduce modern technology of silk farming to farmers: Dr. Ismail
Introduce modern technology of silk farming to farmers: Dr. Ismail 
मुख्य बातम्या

रेशीम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ः डॉ. इस्माइल

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘रेशीम कोश उत्पादनातून शेतकऱ्यांना दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न  मिळू शकते. त्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभवच्या (रावे) विद्यार्थ्यांनी रेशीम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माइल यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी (ता.१) रेशीम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि विद्या शाखा अभ्यास मंडळाचे सदस्य डी. बी. काळे, कृषी किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, चंद्रकांत अडसुळ आदी उपस्थित होते.

काळे यांच्या हस्ते रेशीम कोश काढणीस सुरुवात करण्यात आली. डॉ. लटपटे यांनी रेशीम किटकांवरील रोग, त्यांचे नियत्रंण, तुतीच्या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती दिली.

तुती बेणे मळा रोपवाटीकेस भेट दिली. कोल्हावाडी येथील तुती रोपे नेण्यास आलेले शेतकरी व कृषी कार्यानुभवचे विद्यार्थी सोनू राठोड, राजू सोनवणे, संकेत शेलहाले आदी उपस्थित होते. हरिच्चंद्र ढगे, अरुण काकडे आदींनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT