dnyaneshwari parayan
dnyaneshwari parayan 
मुख्य बातम्या

पंढरीत २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताह

टीम अॅग्रोवन

सोलापूर: अखिल भारतीय वारकरी महामंडळातर्फे पुढील वर्षी २०२१ मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भक्तीपीठाच्या नगरीत म्हणजे भूवैकुंठ पंढरीत ३ जानेवारी ते १० जानेवारी २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सव्वा लाख वारकरी प्रत्यक्ष पारायणास बसतील, अशी माहिती अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी रविवारी (ता. १) येथे दिली.  अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या सोलापूर शाखेतर्फे राज्यस्तरीय वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात बोधलेमहाराज बोलत होते. होटगी मठाचे धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी अध्यक्षस्थानी होते. वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे हभप भागवत महाराज चवरे, अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले, हभप भारत महाराज कोकाटे, हभप गणपत महाराज मगर, हभप रणदिवे बापू महाराज, ह.भ.प अण्णा महाराज बोधले, हभप हरिदास जोगदंड, हभप समाधान महाराज बोंबले आदी उपस्थित होते.  बोधलेमहाराज म्हणाले, गावोगावी पारायण सोहळे होत असतात. तशाच प्रकारचा हा ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा होईल. या सोहळ्यात भारतातील विविध राज्यांसह परदेशातूनही अनेक भाविक सहभागी होणार आहेत. या पारायण सोहळ्यास प्रत्यक्ष सव्वा लाख भाविक बसणार आहेत. तर अडीच लाखापेक्षा अधिक भाविक सहभागी होणार आहेत. पंढरपुरात बोधले महाराज यांच्या  मठासमोरील १२ एकर जागेवर हे पारायण होणार आहे. ६५ एकर जागेवर पार्किंगची सोय केली जाणार आहे. हा ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताह ३ ते १० जानेवारी २०२१ म्हणजे मार्गशीर्ष ४ चतुर्थी ते द्वादशी या कालावधीत होणार आहे.  या पारायण सोहळ्यातून संपूर्ण जगभर आपण मानवतेची शिकवण पोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या सोहळ्याच्या तयारीसाठी आता वर्षभर कालावधी मिळणार आहे. त्यामुळे हा सव्वा लाख भाविकांच्या ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताहाच्या तयारीसही पुरेसा अवधी मिळणार आहे. सर्व धर्म, पंथांच्या प्रचारकांनी, कार्यकर्त्यांनी या देशातील माणूस सुसंस्कृत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी अध्यात्मिक आणि वैचारिक ऐक्य साधून हा देश आपण सर्वांनी सुसंस्कृत, बलशाही करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हाच प्रयत्न या कार्यक्रमाच्या मागे आहे, असेही ते म्हणाले. या वेळी जन्मेजय भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप संजय पवार आणि सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. आध्यात्मिक शिक्षणाची गरज आजच्या शिक्षण पद्धतीत पैसा कसा कमवावा याचे शिक्षण दिले जात आहे. मात्र जीवन कसे जगावे याची शिकवण नाही. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण मिळाले पाहिजे. ते देण्याची आपल्यासारख्या महाराज मंडळी, धर्मगुरू, महास्वामी अशांची जबाबदारी आहे. ती आपण सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे या कार्यक्रमात होटगी मठाचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT