विमा कंपनीला शिवसेनेचा दणका
विमा कंपनीला शिवसेनेचा दणका 
मुख्य बातम्या

विमा कंपनीला शिवसेनेचा दणका

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा नाकारणाऱ्या इफ्को टोकियो या विमा कंपनीला शिवसेनेने बुधवारी (ता. ६) दणका दिला. कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावर असलेल्या इफ्को टोकियो विमा कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडक देत शिवसैनिकांनी कार्यालय तोडून जाब विचारला. 

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील दौऱ्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडल्या. विमा कंपन्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्यामुळे आज शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि नगरसेवक विशाल धनवडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील इफ्को टोकियो कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कंपनीचे कार्यालय उघडताच शिवसैनिक आत घुसले. 

शेतकऱ्यांना पीकविमा का नाकारता, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून कोणतीही उत्तरे न मिळाल्याने संतप्त शिवसैनिकांनी ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन करून कंपनीला हिसका दाखविला. इफ्को टोकियो कंपनीकडे राज्यातील औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, ठाणे, वर्धा, अमरावती, भंडारा, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. दोन लाख शेतकऱ्यांचे ४२ कोटी रुपये विमा कंपनीकडे थकीत आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे पैसे मिळावे, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी विमा कंपन्यांवर आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी पीकविम्याचे पैसे दिले जातील, असे आश्‍वासन दिले गेले. आज शेतकरी संकटात आहेत. पिके वाया गेली आहेत. पावसाने नुकसान केले. पुन्हा पीक घेण्यासाठी नांगरणी आणि बियाणे खरेदीसाठीदेखील मोठा खर्च झाला आहे. म्हणून विमा कंपन्यांना जाग आणून धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचा हा लढा आहे. - संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT