खवासपूर, लोटेवाडीतील चारा छावणीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी
खवासपूर, लोटेवाडीतील चारा छावणीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी 
मुख्य बातम्या

खवासपूर, लोटेवाडीतील चारा छावणीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : सांगोला तालुक्‍यातील खवासपूर, लोटेवाडी शिवणे येथील चारा छावणीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी (ता. ८) भेट देऊन चारा छावणीतील पशुपालकांशी संवाद साधला. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, महसूल उपायक्त प्रताप जाधव, सहायक आयुक्त विलास जाधव, प्रांतधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

छावण्यांतील जनावरांना आवश्‍यक चारा व पुरेसा पाणीपुरवठा मिळतोय का, छावणीत राहणाऱ्या पशुपालकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेतली. त्यांनी चारा छावणीत ठेवण्यात आलेल्या चारासाठा वाटप नोंदवहींची तपासणी केली. चारा छावणीत अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी जनावरांची तपसाणी करावी, तसेच छावणीत दाखल जनावरांची ओळख पटविण्यासाठी टॅगिंग करावे, असे निर्देशही डॉ. म्हैसेकर यांनी दिले. 

या वेळी भोसले यांनी चारा छावणीत छावणी चालकांकडून देण्यात येणारा चारा, पाणी, दाखल जनावरांची संख्या, पशुवैद्यकीय सुविधेबाबतची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT