मुख्य बातम्या

वऱ्हाडात विषबाधेने आठ जण मृत्युमुखी

Gopal Hage

अकोला ः यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीत विषबाधेने शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला अाहे. वऱ्हाडातही या हंगामात गेल्या चार महिन्यांत शंभरावर शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे समोर अाले. यात गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ९७ जणांना विषबाधा झाली होती. यापैकी आठ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर अाली अाहे. येथील रुग्णालयाच्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.  चालू खरीप हंगामात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रकार जून महिन्यापासूनच सुरू झालेे. अकोला येथे मध्यवर्ती रुग्णालय असून, येथे अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती अशा विविध जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात.

जून महिन्यात या ‘सर्वोपचार’ रुग्णालयात फक्त दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले होते. सप्टेंबरअखेरपर्यंत हा अाकडा १३० पर्यंत पोचला. जुलै महिन्यात पाच रुग्ण, आॅगस्टमध्ये २६, तर सप्टेंबर महिन्यात ९७ विषबाधित रुग्ण ‘सर्वोपचार’मध्ये दाखल झाले होते. यातील १०४ रुग्ण हे अकाेला जिल्ह्यातील होते. भरती असलेल्यांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.  खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या पिकांवर रोग, किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पिकांवरील रोग, कीटक, किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध कंपन्यांच्या कीटकनाशकांच्या फवारणीला प्राधान्य देतात. 

१२२ जणांना वाचविण्यात यश फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांमध्ये १०४ रुग्ण हे अकोला जिल्ह्यातील, १७ बुलडाणा जिल्ह्यातील, तर प्रत्येकी ४ रुग्ण अमरावती व वाशिम जिल्ह्यातील होते. यवतमाळमधील एका रुग्णासही या कालावधीत ‘सर्वोपचार’मध्ये दाखल करण्यात आले होते. या १३० रुग्णांपैकी ८ रुग्ण दगावले; मात्र १२२ रुग्णांना वाचविण्यात यश आल्याची माहितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दुजोरा दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT