micro irrigation
micro irrigation  
मुख्य बातम्या

‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी युद्धपातळीवर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदान लाभप्रकरणी चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे. जालना पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यातही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच बीड जिल्ह्यातही चौकशी केली जाईल, असे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी सांगितले. याप्रकणी जालना जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे डॉ. जाधव म्हणाले. जालना जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन अनुदान लाभाविषयीच्या तक्रारीची कृषिमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली होती. स्वतः शुक्रवारी (ता २०) जालना येथील जिल्हा कृषी अधीक्षक यांचे कार्यालय गाठत संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. त्यांनी केलेल्या शहानिशेत बनावट सातबारा तयार करणे, एकाच लाभार्थ्याला दोन योजनेचा लाभ देणे, निकृष्ट साहित्य पुरविणे आदी गंभीर बाबी समोर आल्याचे श्री. भुसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कृषी विभागाचे सचिव व आयुक्त यांच्याशी संपर्क करून याप्रकरणी तातडीने दखल घेण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी दिले होते.  ‘‘यापैकी काही प्रकरणांत प्राथमिक चौकशी झाली, नोटिसाही काढल्या गेल्या. नव्याने समोर आलेल्या आणखी काही प्रकरणांची सचिव आणि आयुक्त चौकशी समिती नेमून ठरावीक काळामध्ये चौकशी पूर्ण करतील. अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’’ असेही श्री भुसे यांनी स्पष्ट केले होते. सद्यःस्थितीत जालना जिल्ह्यात ५ कंपन्यांच्या ८ डीलरमार्फत १२३३ प्रस्तावांची ६ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात येत आहे. जसजशी चौकशीत माहिती मिळेल, तशी पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जालना कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

जालन्यात एक अधिकारी निलंबित जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळांतर्गत कार्यरत कृषी पर्यवेक्षक दिलीप तराळ यांच्यावर २३ नोव्हेंबरला निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या सूचनांची अवहेलना व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जालना पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यातही पथकामार्फत सूक्ष्म सिंचनात काही गैरप्रकार झाला का, याची चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. जाधव म्हणाले. त्यामुळे आता चौकशी सत्रातून काय पुढे येते व कुणा कुणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT