orange
orange  
मुख्य बातम्या

गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी घेणार जुन्या फळझाडांचा शोध

टीम अॅग्रोवन

अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्याचा दर्जा वाढविण्याच्या अनुषंगाने शासनाचा कृषी विभाग व येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संयुक्तपणे मोहीम राबविणार असून संत्र्याच्या गुणवत्तापूर्ण फळझाडांचा शोध घेतला जाणार आहे. याअनुषंगाने फलोत्पादन संचालकांनी कृषी विभागाला निर्देश दिले आहेत. विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा पिकात नवीन वाण, तंत्रज्ञान देण्यात संशोधन संस्था अपयशी ठरल्या आहेत. नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी कधी काळी आणलेल्या संत्रा वाणाचीच या भागात वर्षानुवर्षांपासून लागवड होत आहे. वाण, तंत्रज्ञानासोबतच उत्पादकता, फळांची टिकवणक्षमता, कापणी पश्चात तंत्रज्ञान या बाबतीतही संशोधन संस्थांनी संत्रा उत्पादकांची निराशा केली. विदर्भात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यामधील ७५ हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड तालुक्यात आहे. या भागातील नगदी पीक असतानाही त्याच्या संवर्धनाकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय लिंबूवर्गीय संस्था दोघांचे दुर्लक्ष झाले.  संत्रा लागवड ही जंबेरी, रंगपूर खुंटावर केली जाते. त्यातही जंबेरी खुंटाचा वापर सर्वाधिक होताना दिसतो. सद्यःस्थितीत संत्र्याची देशभरात विविध भागात निर्यात केली जाते. परंतु संत्र्याची फळे ही गुणवत्तापूर्ण नसल्याने तसेच साल सुद्धा घट्ट नसल्याने वाहतुकीत मोठ्या प्रमाणात फळांची नासाडी होत असते. काढणीनंतर फळांचे आयुष्य कमी असल्याने दूरच्या बाजारपेठेत नेताना अडथळे येतात. आता संत्रा उत्पादकांच्या मदतीसाठी थेट कृषी विभाग मैदानात उतरला आहे.  संत्रा उत्पादक पट्ट्यात कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी जुन्या बागांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्याची सूचना विभागीय कृषी सहसंचालकांना देण्यात आली आहे. कृषी सहायक, सेवक, पर्यवेक्षक हे आपापल्या कार्यक्षेत्रातील बागांना भेटी देऊन बागांचे निरीक्षण करतील. वेगळेपण असलेल्या उत्कृष्ट झाडांची यातून निवड केली जाईल. नंतरच्या टप्प्यात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भेट देऊन पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी यंत्रणेला सुचविले आहे.

याची करणार नोंद यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एकत्रपणे नावीन्यपूर्ण गुणधर्म असलेल्या संत्रा फळझाडांची (जसे घट्ट साल असलेली बट्टीदार फळे, आकाराने मोठी, कमी जाडी किंवा मध्यम जाडीची साल असलेली फळे, चवीने गोड किंवा आंबड गोड असलेली फळे, तसेच रंगाने एकसारखी व गर्द नारंगी रंगाची चकचकीत फळे) निवड करणार आहेत. यातून संत्रा बागायतदारांना नवीन वाण देण्याच्या अनुषंगाने पुढील काम करण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया स्थानिक वाणाचे अपग्रेडेशन तसेच जागतिक स्तरावरील इतर संत्रा वाण उपलब्ध केल्यास या भागातील बागायतदार कुठेतरी स्पर्धेत राहतील. त्यादृष्टीने कृषी विभागाने केलेली सुरुवात सकारात्मक आहे.  - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाआॕरेंज,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT