उद्योगपतींच्या संपत्तीत वर्षात दुपटीने वाढ
उद्योगपतींच्या संपत्तीत वर्षात दुपटीने वाढ  
मुख्य बातम्या

उद्योगपतींच्या संपत्तीत वर्षात दुपटीने वाढ

वृत्तसेवा

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. त्यादृष्टीने भरीव काहीही झालेले नसताना, दुसरीकडे देशातील उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे चित्र पुढे आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच वर्षात (२०१७ मध्ये) दुपटीहून अधिक (१२५ टक्के) वाढ झाली आहे.   एका व्यवसायविषयक वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार अदानी ग्रुपचे संस्थापक असलेले गौतम अदानी यांची जानेवारी २०१७  मध्ये ४.६३ अब्ज डॉलर संपत्ती होती. ती डिसेंबर २०१७ अखेर १०.४ अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये वर्षभरात १२४.६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. डी-मार्टचे मालक राधाकृष्णन दमाणी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्च २०१७ मध्ये ३.८८ अब्ज डॉलर असलेली त्यांची संपत्ती डिसेंबर २०१७ अखेर ६.९६ अब्ज डॉलरवर पोचली आहे. 

मुकेश अंबानी यांची जानेवारी २०१७ मध्ये २२.७० अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती. त्यामध्ये ७७.५३ टक्‍क्‍यांनी वाढ होऊन डिसेंबर २०१७ अखेर ती ४०.३० अब्ज डॉलरपर्यंत पोचली. याचबरोबर मुकेश अंबानी हे जागतिक श्रीमंतांच्या यादीत २०व्या क्रमांकावर आले आहेत. पालनजी मेस्त्री, सायरस पूनावाला आणि शिव नाडर यांच्या संपत्तीमध्येही अनुक्रमे २७.०१, १६.५० आणि १५.८३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.   

भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीमधील वाढ (टक्‍क्‍यांमध्ये)

गौतम अदाणी १२४.६
राधाकृष्णन दमाणी ८०
मुकेश अंबानी ७७.५३
कुमार बिर्ला ५०.४१
अझीम प्रेमजी ४६.७२
उदय कोटक ४४.८७
विक्रम लाल ४४.०३
लक्ष्मी मित्तल ३६.११
(आलेख : अप्रमाणित, कालावधी : जानेवारी ते डिसेंबर २०१७ ) 

जागतिक पातळीवरील उद्योजकांची सांपत्तिक स्थिती

नाव जानेवारी २०१७ डिसेंबर २०१७  टक्के 
जेफ बेझोस  ६५ ९९ ५२ 
बिल गेटस ८१.९६ ९१.८ १२
वॉरन बफे ७२.९१ ८५.३ १७
(संपत्ती : अब्ज डॉलरमध्ये) 

---- जागतिक पातळीवरील उद्योजकांची सांपत्तिक स्थिती नाव--- जानेवारी 2017 --- डिसेंबर 2017 --- टक्के जेफ बेझोस--- 65--- 99--- 52 बिल गेटस--- ...--- 91.8--- 12 वॉरन बफे--- ...--- 1785.3--- 17 (संपत्ती : अब्ज डॉलरमध्ये)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT