कापूस खरेदी
कापूस खरेदी 
मुख्य बातम्या

मुक्त व्यापाराने बांगलादेशकडून भारतीय कापसाला उठाव

Chandrakant Jadhav

जळगाव ः बांगलादेशसोबत ड्युटी फ्री (कररहीत व्यापार) धोरणाला केंद्राने पुन्हा एकदा मंजुरी दिली असून, याचा लाभ देशांतर्गत कापूस बाजार किंवा रुईच्या प्रक्रिया उद्योगांना होणार आहे. सुमारे ४० ते ४२ लाख गाठींची निर्यात एकट्या बांगलादेशात यंदा होईल, असे संकेत मिळत आहेत.   

खंडीचे दर (३५६ किलो रुई) यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १८ ते २० टक्‍क्‍यांनी अधिक आहेत. मागील वर्षी खंडीला ३८ हजार रुपये दर होता. तर यंदा ४८ हजार रुपये दर आहे. हे दर मागील महिनाभरापासून टिकून असून, कापूस बाजार स्थिर दिसत आहे. बांगलादेश आशियात आघाडीचा सूत उत्पादक म्हणून समोर आला आहे. तेथे दरवर्षी सुमारे १०० लाख गाठींची आयात करावी लागते. बांगलादेशात मागील वर्षी ०.०३ दशलक्ष मेट्रिक टन कापसाचे उत्पादन झाले. यंदाही तेथे एवढेच उत्पादन येईल. दुसऱ्या बाजूला बांगलादेशातील वस्त्रोद्योगात वाढ सुरूच असून, तेथे १.५० ते १.६० दशलक्ष मेट्रिक टन रुईची आवश्‍यकता आहे. अर्थातच उत्पादन कमी व गरज अधिक असल्याने कापूस आयातीशिवाय बांगलादेशला पर्याय नाही.  डॉलरच्या तुलनेत बांगलादेशचे चलन टाका कमकुवत असून, एक डॉलरसाठी ८५ टाका मोजावे लागत आहेत. या तुलनेत आशियातून कापूस आयात बांगलादेशला परवडणारी ठरत आहे. त्यात आशियात भारत वगळता कुठलाही देश कापूस निर्यात करू शकत नसल्याची स्थिती असून, बांगलादेशला भारताशिवाय पर्याय नाही. समुद्र व रस्ते वाहतूक सुकर असल्याने आणि भारत सरकारने बांगलादेशसोबत गरीब देश म्हणून ड्युटी फ्री ट्रेडला मंजुरी कायम ठेवल्याने त्याचा लाभ बांगलादेशमधील कापूस आयातदार, मिलांना होत आहे. भारतीय रुई अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या रुईच्या तुलनेत स्वस्त पडत असल्याने बांगलादेशने मागील वर्षी भारतातून सुमारे ३८ लाख गाठींची आयात केली. यंदाही ही आयात सुमारे ४० ते ४५ लाख गाठींची असू शकते. सध्या देशांतर्गत बाजारात रुईचे सौदे सुरू असून, सर्वाधिक सौदे बांगलादेशसोबत झाले आहेत. राज्यातील जिनर्सनी मोठ्या निर्यातदारांच्या मदतीने व्हिएतनाम व बांगलादेशसोबत सौदे केले आहेत. मागील महिन्यात सुमारे तीन लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) सौदे झाल्याची माहिती मिळाली.  डॉलरच्या तुलनेत जगभरातील चलन कमकुवत झाल्याने आयातदारांना फटका बसू लागला. त्यात बांगलादेशलाही हा फटका बसला. यामुळे मागील वर्षी बांगलादेशने भारतातून अधिक कापूस आयात केली. अजूनही डॉलरचे दर अधिकच आहेत. शिवाय चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्ध शांत झालेले नसल्याने भारतीय कापसाला बांगलादेशकडून अधिक उठाव राहील, असे जाणकारांनी सांगितले.  नारायणगंज, चिटगावात परकीय गुंतवणूक बांगलादेशातील नारायणगंज, चिटगाव, ढाका भागात वस्त्रोद्योग मागील सहा-सात वर्षात वाढला आहे. चीनने बांगलादेशातील वस्त्रोद्योगात गुंतवणूक केली आहे. देशातील काही उद्योजकांनीही बांगलादेशात गुंतवणूक केली आहे. बांगलादेशात दरवर्षी सुमारे अडीच हजार कोटी किलोग्रॅमपर्यंत सुताचे उत्पादन होऊ लागले असून, बांगलादेश भारतानंतर आघाडीचा सूत उत्पादक देश बनला आहे. तेथे रुईची बारमाही मागणी असते, अशी माहिती मिळाली. या सर्व स्थितीत बांगलादेशात भारतातून यंदा अधिकची कापूस निर्यात होईल, अशी माहिती मिळाली आहे.

बांगलादेशातील उत्पादन व कापसाची मागणी (दशलक्ष मेट्रिक टनांत)

वर्ष उत्पादन मागणी
२०१५-१६ ०.०३ १.३२
२०१६-१७ ०.०३ १.४१
२०१७-१८ ०.०३ १.४४
२०१८-१९ ०.०३ १.५०

भारतातून बांगलादेशात झालेली कापूस निर्यात (लाख गाठी)

वर्ष  निर्यात
२०१४-१५    २२.९१
२०१५-१६     २२.३४
२०१६-१७ २४.०४
२०१७-१८    ३८.१५
२०१८-१९  ४० ते ४५  (अपेक्षित)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT