भारत-इस्राईलमध्ये कृषी, जल व्यवस्थापन सहकार्य
भारत-इस्राईलमध्ये कृषी, जल व्यवस्थापन सहकार्य 
मुख्य बातम्या

भारत-इस्राईलमध्ये कृषी, जल व्यवस्थापन सहकार्य

वृत्तसेवा

नवी दिल्ली : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर अाहेत. सोमवारी (ता. १५) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कृषी, जल व्यवस्थापनासह नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सौरऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत.

भारत आणि इस्राईलदरम्यान नऊ सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्राईल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. तसेच सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील करारांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यंदाचे वर्ष हे भारत व इस्राईल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे २५ वे वर्ष आहे. नेतन्याहू यांच्यासोबत मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. भारत व इस्राईलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि प्रगतीसाठी मिळून काम करूया. - बेंजामिन नेतन्याहू , पंतप्रधान, इस्राईल दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्टअप इंडिया, संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत सहमती झाली आहे. आगामी काळात दोन्ही देश एकमेकांच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करतील, अशी मला आशा आहे. - नरेंद्र मोदी , पंतप्रधान, भारत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT