Increasing cold effect on bananas
Increasing cold effect on bananas 
मुख्य बातम्या

वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम

टीम अॅग्रोवन

रावेर, जि. जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे केळी निसवण्याच्या (कापणीयोग्य होण्याच्या) प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून, कापणीयोग्य केळीचे प्रमाण १० टक्‍क्‍यांपर्यंत घसरले आहे. एरवी हंगामात तीनशे ते चारशे ट्रक भरून केळी उत्तर भारतात निर्यात होत असताना सध्या हे प्रमाण अवघे ३५ ते ४० ट्रकपर्यंत घसरले आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पारा १० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरला आहे. थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार होत आहे. सध्या रावेर पट्ट्यातून दररोज फक्त १७ ते १८ आणि सावदा पट्ट्यातून दररोज केवळ २० ट्रक केळी उत्तर भारतात पाठवली जात आहे. १५० ते २०० ट्रक केळी लिलाव होणाऱ्या बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत काल (ता. १०) फक्त २२ ट्रक केळीचा लिलाव झाला.

जिल्ह्यात कापणीयोग्य केळीचे प्रमाण कमी झाले. उत्तर भारतातून केळीची मागणीही खूपच कमी झाली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बर्फवृष्टीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते बंद असतात. तिथे केळीची मागणी असली तरीही तिथे ट्रक पोचू शकत नाहीत. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या भागात देखील केळीची मागणी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सध्या राजस्थानमध्ये जिल्ह्यातील केळीची मागणी आहे. 

दिवाळीनंतर केळीची कापणी कमी होत जाते तसे भावही कमी होत जातात. सध्या मागणी कमी, केळीची कापणी ही कमी आणि त्यामुळे भावही कमी आहेत. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून थंडी कमी होत जाऊन ऊन व तापमान वाढत जाणार आहे. यामुळे केळी कापणीसाठी तयार होण्याचे आणि कापणीचे प्रमाणही वाढणार आहे. या काळात निर्यातक्षम केळी मालाची कापणी ही सुरू होणार आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातून केळीची निर्यात सुरू होईल अशी चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT