Increase in production cost of raisins up to 20%
Increase in production cost of raisins up to 20% 
मुख्य बातम्या

 बेदाणा उत्पादन खर्चात २० टक्क्यांपर्यंत वाढ

टीम अॅग्रोवन

सांगली ः बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक आणि कोरोगेटेड बॉक्ससाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात बंद आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. पॅकिंगला लागणाऱ्या साहित्यातही वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बेदाणा उत्पादन खर्चात २५ टक्‍क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे.

जिल्ह्यात बेदाणा मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. दर्जेदार बेदाणा तयार करण्यासाठी डिपिंग ऑइल, कार्बोनेट आणि गंधकाचा वापर केला जातो. त्यामुळे बेदाणा हंगाम सुरू झाला, की याची मोठी मागणी असते. बेदाणा हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा तयार करणाऱ्या शेड मालकांकडून याची खरेदी सुरू केली आहे. यासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल आयात केला जातो. परंतु आयात बंद असल्याने कच्चा मालाचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतुकही वाढली आहे. तसेच डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक हे पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. याला लागणाऱ्या पॅकिंगच्या साहित्याचे देखील दर वाढले आहेत. परिणामी, या साऱ्यांमुळे यंदा डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक तयार करणाऱ्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गतवर्षी एक टन बेदाणा तयार करण्यासाठी सुमारे २५ हजार ते २६ हजार रुपये इतका खर्च आला होता.  मात्र या दरवाढीमुळे एका टनाला ३ ते ४ हजार टन इतका खर्च वाढणार असून, तो खर्च २८ ते २९ हजार इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत असल्याने अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे.

कोरोगेटेड बॉस्कसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा बेदाणा, डाळिंबासह भाजीपाला पॅकिंगसाठी कोरोगेटेड बॉस्कचा वापर केला जातो. बॉक्स तयार करण्यासाठी युरोपातून इंपोर्टेड वेस्ट आयात केले जाते. मात्र, गेल्या वर्षभरापासून इंपोर्टेड वेस्ट भारतात येत नाही. त्यामुळे कागदाची टंचाई जाणवत आहे. परिणामी पुरेसे वेस्ट उपलब्ध होत नसल्याने बॉक्स तयार होत नाहीत. त्यातही भारतातही कच्चा माल नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला प्रति बॉक्सचा ३० ते ३२ रुपये असा दर होता. मात्र यंदाच्या हंगामात पाच रुपयांनी वाढू तो ३५ ते ३७ रुपयांपर्यत पोहोचला आहे. बॉक्सच्या दरवाढीचा भार बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी बसणार आहे.

प्रतिक्रिया डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक आणि कोरोगेटेड बॉक्स दरात वाढ झाली असून, बेदाणा उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. परिणामी अतिरिक्त खर्च बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. -पंकज म्हेत्रे, बेदाणा उत्पादक शेतकरी,  मिरज, जि. सांगली  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT