Increase in online warehouse mortgage loan 
मुख्य बातम्या

  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात वाढ 

राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन) शेतीमाल तारण कर्जाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या १५ दिवसांत दीड कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले असून, या हंगामात ७१० शेतकऱ्यांनी सुमारे १४ कोटी १९ लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन) शेतीमाल तारण कर्जाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या १५ दिवसांत दीड कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले असून, या हंगामात ७१० शेतकऱ्यांनी सुमारे १४ कोटी १९ लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे. तर सर्वसाधारण तारण कर्जात ४ हजार १७७ शेतकऱ्यांनी सुमारे १३४ कोटींचे कर्ज घेतले आहे. अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दीपक तावरे यांनी दिली. 

गेल्या पंधरा दिवसांत (८ नोव्हेंबरअखेर) सर्वसाधारण तारण कर्ज सुमारे १२५ कोटींचे होते. यामध्ये वाढ होऊन आता २३ नोव्हेंबर अखेर १३४ कोटी ४१ लाखांचे कर्ज देण्यात आले आहे. तर वखार महामंडळाच्या नावीन्यपूर्ण ऑनलाइन (ब्लॉकचेन) तारण कर्ज योजनेला देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, गेल्या पंधरा दिवसांत दीड कोटींचे अधिकचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे ऑनलाइन कर्जाचा टप्पा १४ कोटी १९ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. तर शेतकरी संख्या ७१० एवढी झाली आहे.  विभागनिहाय ऑनलाइन (ब्लॉकचेन) कर्जवाटप आणि शेतकरी संख्या  जिल्हा --- शेतकरी --- कर्ज (रुपयांमध्ये)  अमरावती --- १०८ --- १ कोटी ८२ लाख १४ हजार ३२  औरंगाबाद --- १६ --- ३० लाख ९७ हजार ३७६  कोल्हापूर --- ९ ---१० लाख ४६ हजार  लातूर --- ४६६ --- ९ कोटी ९३ लाख ८१ हजार २३१  नागपूर --- ४९ --- ८८ लाख ७ हजार ४२८  नाशिक --- २३ --- ४५ लाख ३१ हजार १०१  पुणे --- ३९ --- ६८ लाख ४६ 

ऑनलाइन कर्जाची शेतमालनिहाय आकडेवारी  शेतीमाल --- शेतकरी संख्या --- कर्जाची रक्कम  हळद --- २१८ --- ५ कोटी १४ लाख  सोयाबीन --- २५१ --- ३ कोटी ९१ लाख  चना --- १३४ --- २ कोटी ९२ लाख  तूर --- ५८ --- १ कोटी ४३ लाख  धान --- २२ --- ३१ लाख ४८ हजार  मूग --- ७ --- १४ लाख ८३ हजार  मका --- ४ --- ८ लाख १९ हजार  लागवडीयोग्य बियाणे --- १ --- ७ लाख ५० हजार  ज्वारी --- ७ --- ६ लाख ८६ हजार  वाटाणा --- २ --- ४ लाख २४ हजार  भुईमूग --- १ --- २ लाख ५० हजार  उडीद --- २ -- १ लाख १३ हजार  तीळ --- १ -- ७५ हजार  गहू --- २ --- १५ हजार  एकूण शेतकरी --- ७१० -- १४ कोटी १९ हजार ४४   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT