Increase in the number of corona sufferers patients in Akola
Increase in the number of corona sufferers patients in Akola 
मुख्य बातम्या

अकोल्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ 

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या तीन दिवसांत अकोल्यातील कोरोनाबाधीतांची संख्या जोमाने वाढत चालली आहे. मंगळवारी (ता. पाच) सकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७५ झाला आहे. 

सोमवारी जिल्ह्यात ६४ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झालेला आहे. मंगळवारी ११ पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ७५ झाली. सध्या ५५ जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. मंगळवारी ३२ अहवाल आले. त्यातील २१ जणांचे निगेटीव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहम्मद अली रोड भागातील आहेत. तर उर्वरितांपैकी दोन जण बैदपुरा भागातील असून उर्वरित पाच हे अनुक्रमे गुलजारपुरा, खंगनपुरा, कृषी नगर, ताजनगर व बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी आहेत. 

ग्रामीण भागात शिरकाव  कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक अकोला महानगर पालिका क्षेत्रापुरती मर्यादीत होती. मात्र, सोमवारी (ता. ४) बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर आणि मंगळवारी पिंजर येथे रुग्ण आढळून आले. या दोन्ही गावांत रुग्ण आल्याने तातडीने प्रशासनाने तेथे परिसर सील करून आरोग्यविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी हातात घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT