साखर हंगाम २०१७-१८
साखर हंगाम २०१७-१८ 
मुख्य बातम्या

अपूर्ण माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांचे परवाने अडकले

मनोज कापडे

पुणे : राज्यातील ५५ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहे. अजून सहा कारखान्यांना लवकरच परवाना मिळणार असून, अपूर्ण माहिती देणाऱ्या ६० पेक्षा जास्त साखर कारखान्यांचे परवाने अडकले आहेत. एक नोव्हेंबरपासून हंगाम चालू करण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ६० पेक्षा जास्त कारखान्यांनी तयारी केली आहे. यंदा गाळपात एकूण १८९ साखर कारखाने भाग घेण्याची शक्यता आहे. हंगाम सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांचा परवाना बंधनकारक आहे. परवान्यासाठी कारखान्यांकडून ऑनलाइन माहिती मागविण्यात आली. मात्र अनेक कारखान्यांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे या कारखान्यांना परवाने देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली.  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखर कारखान्यांना ऑनलाइन परवाना देण्याच्या सूचना गेल्या हंगामात दिल्या होत्या. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ऑनलाइन परवान्यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करून याच हंगामापासून हस्तलिखित परवान्याची पद्धत मोडीत देखील काढली आहे.  पहिल्या टप्प्यात ५५ साखर कारखान्यांना साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन परवाना देत कामाला सुरवात करण्यात आली आहे. मात्र, वेगवान कामाच्या धोरणात कोणत्याही साखर कारखान्याला घाईघाईने परवाना दिला जाणार नाही. त्यासाठी अपूर्ण माहिती दिलेल्या कारखान्यांचे परवाने थांबविण्यात आले आहेत, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.  मागील पाच वर्षांचे गाळप आणि साखर उत्पादन, उपलब्ध उसाचे क्षेत्र तसेच आर्थिक कामकाजाची माहिती साखर कारखान्यांकडे मागण्यात आली आहे. परवाना मिळालेले कारखाने एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष गाळप सुरू करण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे गेल्या हंगामात ३७३ लाख टन ऊस राज्यात होता. चालू हंगामासाठी ६५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.    शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना परवाना मिळण्यात अडचणी आहेत. तसेच ऑनलाइन परिपूर्ण माहिती न देणाऱ्या साखर कारखान्यांना पत्रे दिली जात आहेत. अपेक्षित माहिती मुदतीत न मिळल्यास अशा साखर कारखान्यांबाबत सुनावणी घ्यायची की परवाना दिला जाणार नसल्याचे नकारपत्र द्यायचे याविषयी साखर आयुक्त निर्णय घेतील, असे कारखाना सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT