Inauguration of 14 Revenue Boards in Nanded District
Inauguration of 14 Revenue Boards in Nanded District 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात चौदा महसूल मंडळाची नवनिर्मिती

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये १४ ने वाढ झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात  ८० महसूल मंडळे होती. यात चौदा महसूल मंडळाची भर पडली आहे. नांदेड शहरातील वजीराबाद महसूल मंडळ कमी केले आहे. यामुळे जिल्ह्यात आता हसूल मंडळाची संख्या ९३ झाली आहे. यासोबतच ८४ तलाठी सज्जे वाढल्यामुळे एकूण तलाठी सज्जे ५४१ झाले आहेत.

मराठवाड्यात सर्वाधिक १६ तालुके असलेल्या नांदेडमध्ये महसूल विभागाने महसूल मंडळाची पुनर्रचना करून त्यात वाढ केली आहे. यापूर्वी जिल्ह्यात ८० हसूल मंडळ तर ४५७ तलाठी सज्ज होते. यात नांदेड शहरातील वजीराबाद मंडळाचे पूर्ण शहरीकरण झाल्यामुळे हे मंडळ गोठवले आहे. तर इतर १४ महसूल मंडळाची वाढ केल्यामुळे आता ९३ महसुल मंडळ तर तलाठी सज्जे ८४ ने वाढून ५४१ झाले. 

नांदेड जिल्ह्यात महसूल विभागाने कामात सुसूत्रता यावी यासाठी महसूल मंडळ व तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. सोळा तालुक्यात यापूर्वी ८० महसूल मंडळ तर ४५७ तलाठी सज्ज होते. आता पुनर्रचनेनंतर महसूल मंडळाची संख्या १४ वाढून महसूल मंडळ ९३ झाले. तलाठी सज्जे ८४ वाढून ५४१ तलाठी सज्जे झाले.

तालुकानिहाय वाढलेली महसूल मंडळे

वाढ झालेल्या महसूल मंडळांमध्ये नांदेड तालुक्यात नाळेश्वर व वाजेगाव, कंधार तालुक्यात दिग्रस बुद्रूक, लोहा तालुक्यात सावरगाव नसरत, धर्माबाद तालुक्यात शिरसखोड, उमरी तालुक्यात धानोरा बुद्रूक, हदगाव तालुक्यात बरडशेवाळा, किनवट तालुक्यात शिंदगी मो व उमरी बाजार, देगलूर तालुक्यात नरंगल बुद्रूक, मुखेड तालुक्यात आंबुलगा बुद्रूक, भोकर मध्ये भोसी, बिलोली तालुक्यात रामतीर्थ तर नायगाव तालुक्यात घुंगराळा महसूल मंडळाची नवनिर्मिती झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT