cotton procurement  
मुख्य बातम्या

शासकीय कापूस खरेदीवर परिणाम

खानदेशात सुमारे २६ लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी विविध केंद्रांमध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात खरेदी रखडत झाली.

Chandrakant Jadhav

जळगाव ः खानदेशात सुमारे २६ लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी विविध केंद्रांमध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात खरेदी रखडत झाली. त्यामुळे आवक कमी झाली असून, एका केंद्रात रोज फक्त दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी किंवा आवक झाली आहे.  डिसेंबरच्या मध्यापर्यंत कापसाची आवक सर्वच केंद्रांमध्ये वेगात सुरू होती. कापूस महामंडळ (सीसीआय), पणन महासंघाची खरेदी जळगाव, धुळे व नंदुरबारात सुरू आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी चार हजार क्विंटल कापसाची आवक एका केंद्रात झाली. चोपडा (जि.जळगाव) येथील एका खरेदी केंद्रातील कापसाला आग लागली होती. यामुळे ‘सीसीआय’ने एका केंद्रात रोज फक्त अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी करा, खरेदी केंद्रात कापसाचे ढीग तयार होवू देवू नका, खरेदीनंतर प्रक्रियेला वेग द्यावा आणि कापूस गाठी, सरकीचा साठा व्यवस्थित, सुरक्षित करावा, अशा सूचना दिल्या होत्या. यातच खरेदी करताना दुय्यम दर्जाच्या कापसाचा दर देण्यास ‘सीसीआय’ने सुरवात केली. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर खानदेशात विविध केंद्रांमध्ये सुमारे चार लाख क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढे ‘सीसीआय’कडील आवक आणखी कमी होईल, अशी स्थिती आहे.

यामुळे खरेदी केंद्रांकडे पाठ

  • कापसाला ५५५० ते ५६१५ रुपये दर
  • वाहनांच्या रांगा, वाहतूक खर्च अधिक
  • हमाली, तोलाईची कटती
  • मोजमापास होणारा उशीर
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

    20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

    PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

    Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

    SCROLL FOR NEXT