Hurricane signs in the Arabian Sea
Hurricane signs in the Arabian Sea 
मुख्य बातम्या

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचली आहे. आज (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर उद्या (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्‍चिमेकडे सरकून जाणाऱ्या या प्रणालीमुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ रविवारी (ता. २६) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातकडे निघून गेले. बुधवारी (ता. २९) सकाळी ठळक कमी दाबाचे क्षेत्र असलेली प्रणाली दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये सक्रिय होती. आज (ता. ३०) अरबी समुद्राकडे गेल्यानंतर ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत.

अरबी समुद्रातील प्रणालीमुळे दोन दिवस उंच लाटा उसळणार असून, ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज (ता. ३०) गुजरात आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर ही प्रणाली भारतीय किनाऱ्यापासून दूर पाकिस्तान आणि मकरान किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला या प्रणालीचा प्रभाव जाणवणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT