लोक सहभागातून बांधण्यात आलेला वनराई बंधारा.
लोक सहभागातून बांधण्यात आलेला वनराई बंधारा. 
मुख्य बातम्या

पाण्याच्या साठवणीसाठी शेकडो हात सरसावले

टीम अॅग्रोवन

नगर : नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील कोळवाडी येथे सिंदफणा नदीवर कोलाय देवीच्या मंदिरामागे कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेल्या दहा वर्षांपूर्वी मोजमाप होऊन खडक टेस्टिंगही झाली. मागील शासनाच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री सुरेश धस यांनी मागणी लावून धरत टेंडरसुद्धा झाले. ते सरकार पडले अन युतीची सत्ता आली अन् या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाला पुन्हा खीळ बसली. त्यामुळे कोळवाडीकरांनी कोल्हापुरी बंधाऱ्याची वाट न पाहता त्याच जागेवर लोकसहभागातून एका दिवसात नदीपात्रात वनराई बंधारा तयार केल्यानंतर एक किलोमीटरपर्यंत पाण्याचा फुगार झाला आहे.

वनराई बंधारा एक चांगली संकल्पना आहे. सध्या ही संकल्पना दुर्लक्षित असल्याचे सर्वत्र चित्र असताना कोळवाडी ग्रामस्थांनी या संकल्पनेला पुनर्जीवित केले. कोळवाडी ग्रामस्थांनी दूरदर्शी पणा ठेवून आपल्यासाठी आपणच पाणी उपलब्ध करून घेण्याला मूर्त स्वरूप दिले. जवळपास दोन लाखांवर खर्चाचे काम लोकसहभागातून फक्त बारा हजारात केले गेले. सुमारे एक किलोमीटर पर्यंत पाणी साठा झाला आहे.

या कामासाठी संदीपान नेटके यांनी स्वतःचे पोकलेन मशिन मोफत उपलब्ध करून दिले. तर डिझेल ग्रामस्थांनी टाकले. पाणी पाझरून जाऊ नये म्हणून भिंतीच्या आतून प्लॅस्टिकचे आवरण टाकले वनराई बंधाऱ्यात साचलेले हे पाणी सर्वांसाठी आशादायी असून कोळवाडी ग्रामस्थांचा हा उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनावणे यांनी सांगितले.

सिंदफणा नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे उभारण्याची प्रक्रिया शासनाने राबवली तर भविष्यात शिरूर कासार तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली निघाल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT