गांडूळवाढीसाठी गृहिणीचा ध्यास
गांडूळवाढीसाठी गृहिणीचा ध्यास 
मुख्य बातम्या

गांडूळवाढीसाठी गृहिणीचा ध्यास

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : वर्षभरापासून गांडूळ खताचे उत्पादन व गांडुळांची संख्या वाढविण्याचा उपक्रम येथील शकुंतला देसरडा यांनी हाती घेतला आहे. परसबागेतील प्रकल्पात जवळपास दोनशे किलो गांडूळ निर्माण केल्यानंतर आता ते शेतकऱ्यांना मोफत देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. याद्वारे गांडूळाची संख्या वाढीतून खत उत्पादनाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. 

सिडको एन. ४ मधील एमआयटी हॉस्पिटलजवळील निवास स्थानाच्या परसबागेतील प्रकल्पातच देसरडा गांडुळाची निर्मिती करतात. त्यापासून गांडूळ खताचे उत्पादन घेतात. याची सुरवात करण्यासाठी त्यांनी जवळपास एक किलो 'एसोनिया फेटीडा' जातीचे गांडूळ हैदराबादवरून आणले होते. त्यांच्या खाद्यासाठी त्यांनी शेजारी कुटुंबीयांकडून ओला कचरा गोळा करण्यास सुरवात केली. तो कुजल्यानंतर त्याचा गांडुळाचे खाद्य म्हणून वापर करण्यासाठी परस बागेतील प्रकल्पांतर्गत बेडवर टाकण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले.

या पद्धतीने परसबागेत गांडूळनिर्मितीच्या कार्याला मैत्रिणींनीही प्रतिसाद दिला. स्वतः १०० किलो, मैत्रिणींकडे मिळून १०० किलो, असे एकूण २०० किलो गांडुळांचे उत्पादन घेतल्याचे देसरडा यांनी सांगितले.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना येत्या खरिपात जमीन सुपीकतेसाठी आधार मिळावा म्हणून ते आणि त्यांचे सहकारी शेतकऱ्यांना गांडूळ मोफत देणार आहेत. चाळीस वर्षांपासून या विषयात काम करीत अाहे, अशी माहिती देसरडा यांनी यावेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT