अधिवेशनात ‘ऐतिहासिक’ अडथळा; वीज गेल्यानं सभागृह तहकूब
अधिवेशनात ‘ऐतिहासिक’ अडथळा; वीज गेल्यानं सभागृह तहकूब 
मुख्य बातम्या

पाणी तुंबल्याने वीज गेली, विधासभेचे कामकाज तहकूब

टीम अॅग्रोवन

नागपूर : अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर आज (ता.६) पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करावे लागले. विधानभवनाच्या पाॅवर हाऊसमध्ये पाणी साचल्याने संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज गायब झाल्याने सभागृह स्थगित करावे लागले. विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरीकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली.  दरम्यान 

अजित पवार यांनी संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास ? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय ? असा सवाल केला. पाॅवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवनात्या आवारात विचारत होते. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय वगळता संपूर्ण मंत्री, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये अंधारात आहेत, फॅन, लाईट बंद आहेत. मुंबईला जो न्याय तोच नागपूर मनपाला द्या :शिवसेनेचा भाजपवर पलटवार 

राजधानी मुंबई दरवर्षी तुंबते यावरून शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भाजपवर आज नागपूर तुंबल्याने शिवसेनेनं पलटवार केला. रविभवन व आमदार निवाससह विधानभवनात पाणी तुंबल्याने शिवसेनेनं हल्लाबोल केला.  मुंबईचा नैसर्गिक भूभाग समुद्रसपाटीला असून नागपूरपेक्षा कित्येक पट पाऊस जास्त पडतो. मात्र मुंबई महानगरपालिका तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणते असा दावा आमदार सुनिल प्रभू यांनी केला.

मुंबई तुंबल्यानंतर महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. आता नागपूरात पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन बंद करावे लागले याला नागपूर महापालिका जबाबदार नाही काय ? जो न्याय राजधानी मुंबई मनपा ला दिला जातो तो न्याय उपराजधानी नागपूर देणार काय असा सवाल शिवसेना नेते व आमदार उपस्थित करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT