In Hingoli, Parbhani district, farmers pay Rs 51 crore in arrears 
मुख्य बातम्या

हिंगोली, परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून ५१ कोटींचा थकीत वीज देयकांचा भरणा

हिंगोली :महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे.

टीम अॅग्रोवन

हिंगोली : महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे. एकूण ७८ हजार ६१९ शेतकऱ्यांनी ५१ कोटी २ लाख रुपये भरले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील ८७३ आणि परभणी जिल्ह्यातील ९५९  शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकी भरली आहे. ५० टक्के वीजबिल माफीसाठी केवळ २८ दिवस उरले आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. 

राज्याच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपांच्या वर्षानुवर्षे थकीत वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम माफ करण्यात येत आहे. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपेल.

एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळेल. या योजनेचा लाभ घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांची बिले भरली, तर शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज देणे शक्य होईल. या शिवाय नवीन शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडण्याही उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकबाकी भरून  कृषिपंपाचा वीजपुरवठा अबाधित ठेवावा, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रेय पडळकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT