The highest number of wheat seed chaining in the Nagar district
The highest number of wheat seed chaining in the Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे प्रमाण सर्वाधिक

टीम अॅग्रोवन

नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत बियाणे बदलाचे सर्वाधिक प्रमाण गव्हाचे आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक सुमारे पावणेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होत असताना या पिकात बियाणे बदलाचे प्रमाण मात्र अवघे ९ टक्के आहे. करडईत बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के असले, तरी क्षेत्र मात्र अवघे साडेआठशे हेक्टर आहे. कृषी संशोधनातून पिकांच्या विविध नवीन जाती विकसित केल्या जात असतानाही बियाणे बदलाचे प्रमाण अल्प असल्याने संशोधन बांधापर्यंत पोचत नाही का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात खरिपापेक्षा रब्बीचे क्षेत्र अधिक असते. ज्वारीचे पीक सर्वाधिक पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. ज्वारीच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी विद्यापीठ, कृषी विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विद्यापीठांनी जास्त उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. त्यात बियाणे बदलाचे प्रमाण वाढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन वाणांची पेरणी करावी, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, तरीही सुधारित वाणांची पेरणी करण्याऐवजी पारंपरिक जातीचे बियाणे वापरले जात असल्याचे कृषी विभागाकडील बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार दिसून येत आहे. 

हरभऱ्याची साधारण एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. हरभऱ्याच्या बियाणे बदलाचे प्रमाणही फारसे वाढलेले नाही. हरभऱ्याचे बियाणे बदलाचे प्रमाण १८ टक्के असून, सर्वाधिक बियाणे बदलाचे प्रमाण करडईचे असले, तरी करडईचे क्षेत्र मात्र अवघे साडेआठशे हेक्टर आहे. मक्याचे रब्बीतील क्षेत्र २८ हजार हेक्टर असते.

मक्यामध्ये विविध जाती विकसित असताना बियाणे बदलाचे प्रमाण अवघे १९ टक्के आहे. नगरमध्ये रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल, करडई व मका या पिकांसाठी यंदा ५७ हजार ५१३ क्विंटल बियाणे मागविण्यात आले. त्यातील बहूतांश बियाणे उपलब्धही झाले आहेत. गतवर्षी २९ हजार ७३७, २०१७ मध्ये ३६ हजार ८९४; तर २०१६ मध्ये ४७ हजार ०५३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

SCROLL FOR NEXT