संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी

Chandrakant Jadhav

जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी वेगात सुरू आहे. त्यात कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून हरभऱ्याला पसंती मिळत आहे. जिल्हाभरात तापी व गिरणाकाठावरील गावांमध्ये यंदाही हरभऱ्याची पेरणी अधिक असून, यापाठोपाठ दादर (ज्वारी) व मक्‍याची पेरणी केली जात आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ३८ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगामाची पेरणी होईल, असा अंदाज किंवा उद्दिष्ट कृषी विभागाने बांधले आहे. रब्बी पेरणीला वेग आला असता, परंतु मध्यंतरी पाऊस आल्याने उडीद, मुगाच्या रिकाम्या क्षेत्रातील पेरणी काहीशी रखडली. त्यात दिवाळी सण आला. अशात पेरणी रखडली होती. दिवाळी आटोपताच थंडी वाढल्याने पेरणीला वेग आला आहे.

पावसानंतर काही शेतकऱ्यांनी लागलीच मशागत करून हरभरा व दादरची पेरणी केली. आजघडीला दादर व हरभऱ्याचे पीक जोमात आहे. त्यात वातावरणात गारवा वाढू लागल्याने या पिकांची वाढही जोमात आहे.

ज्वारी, सोयाबीन याच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मका पेरणी सुरू आहे. यावल, चोपडा, एरंडोल भागात काही शेतकरी कांदा लागवड करीत आहेत; परंतु बागायती रब्बी पिकांमध्ये मका पेरणीला अधिक पसंती मिळत आहे. गहू पेरणीस अजून फारशी सुरवात झालेली दिसत नाही. परंतु पुढील आठवड्यात तापीकाठावरील गावांमध्ये गहू पेरणी सुरू होईल, असे चित्र आहे.

जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास ३५ ते ३६ हजार हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक २० ते २२ हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या हरभऱ्याचे आहे. यापाठोपाठ दादरची जवळपास सात ते आठ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मका व कांद्याचे क्षेत्र अनुक्रमे चार व दीड हजार हेक्‍टर असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

बियाणे मुबलक रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे मुबलक प्रमाणात आहे. विविध कंपन्यांसह महाबीजचे बियाणे शेतकरी घेत आहेत. तसेच गव्हाचे बियाणे पुढील आठवड्यात येईल. गहू पेरणीची मुदत अगदी १५ डिसेंबरपर्यंत असल्याने हे बियाणे टप्याटप्प्याने येईल, असे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी सांगितले.

अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होणार जिल्ह्यात रब्बीची अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होईल, अशी स्थिती आहे. ऑक्‍टोबरमध्ये आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांना कोरडवाहू रब्बी पिके पेरणीची उभारी मिळाली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे गवत वाढले. त्यात वाफसा मिळत नाही. ट्रॅक्‍टरने मशागत करून घ्यावी लागत आहे. त्यात काही दिवस आणखी वेळ लागेल. अनेक ठिकाणी ट्रॅक्‍टर मशागतीसाठी उपलब्ध होत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT