Onion
Onion  
मुख्य बातम्या

सर्वाधिक दर मोजक्याच कांद्याला

सुर्यकांत नेटके

नगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून सर्व पातळीवर ऊहापोह होत असला, तरी शेतकऱ्यांना मिळत असलेला आणि ग्राहक देत असलेल्या दरात किलोमागे तीस ते चाळीस रुपयांची तफावत असल्याचे दिसत आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये मिळणारा २० ते २१ हजारांचा दर नगण्य गोण्यांनाच मिळत आहे. इतर कांद्याला सरासरी आठ हजारांचाच दर मिळत आहे. नगरसह राज्यात सध्या केवळ कांद्याच्या दराची चर्चा होत आहे. नगर जिल्ह्यात कमाल दर २१ हजारांपर्यंत, तर सोलापुरात २० हजारांपर्यंत गेला होता. यामुळे बजेट कोलमडल्याची ओरड सर्वच ठिकाणी होत आहे. माध्यमातही कांदादराची चवीने चर्चा होत आहे. कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाला, यावर माध्यमे लक्ष ठेवून आहेत. मात्र घाऊक बाजारात जसा दर वाढेल, तसा किरकोळ बाजारातही दर वाढत आहेत. असे असले तरी सध्या घाऊक बाजारात शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहक खरेदी करत असलेल्या किरकोळ बाजारातील कांद्याच्या दरात सुमारे तीस ते चाळीस रुपयांची तफावत आहे. घाऊक बाजारात सर्वाधिक मिळणारा दर हा जुन्या गावरान कांद्याला आहे. घाऊक बाजारात ६० रुपये किलोने विकला जाणारा कांदा कोरकोळ बाजारात १०० ते १२० रुपयांनी विकला जात आहे.  शेतकरी ते ग्राहक यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी शासनाने थेट शेतकरी ते ग्राहक शेतीमाल विक्रीची संकल्पना राबवली. याच संकल्पनेतून मुंबई, पुणे, नगर, नाशिकसह अन्य शहरांत थेट शेतकरी ते ग्राहक शेतीमाल विक्री केंद्रे सुरू केली होती, ती बंद पडल्यानेच बाजारात घाऊक आणि किरकोळ दरांत तफावत असल्याचे दिसत आहे.

विक्रमी दर थोड्याच कांद्याला नगर जिल्ह्यात नेवासा बाजार समितीत वीस हजार, तर राहुरीत एकवीस हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा गेला. मात्र हा दर बोटावर मोजण्याएवढ्याच गोण्यांना मिळाला. घोडेगाव बाजार समितीत आत्तापर्यंत आवघ्या दोनशे गोण्यांना वीस हजारांचा दर मिळाला. राहुरीत पंचवीस गोण्यांना एकवीस हजारांचा दर मिळाला. अन्य बाजार समित्यांतही हीच स्थिती आहे. बहुतांश कांद्याला ८ हजारांच्या आतच दर मिळत आहे. 

प्रतिक्रिया कांद्याची मागणी आधारित पुरवठा होणे गरजेचे आहे. असे असेल तर कांद्याला दर टिकून राहील. मात्र दर नसतानाही शासनाने हस्तक्षेप केला तर तो चुकीचा आहे. शिवाय थेट विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली तर शेतकरी आणि ग्राहकांनाही फायदा होईल. - बाळासाहेब राशीनकर, कांदा उत्पादक शेतकरी, बेलापूर, ता. श्रीरामपूर  सोमवारी (ता. ९) कांदा दराची स्थिती (प्रतिकिलो / रुपये) 

ठिकाण  घाऊक  किरकोळ
नगर   १० ते १०० ७० ते १३० 
नाशिक  ४३ ते ९६.५१ १०० ते १२० 
सोलापूर  २० ते ११० ९० ते १३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT