उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या दुथडी भरून
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या दुथडी भरून 
मुख्य बातम्या

उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या दुथडी भरून

वृत्तसेवा

नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंडमध्ये पाऊस व पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४ झाली असून, या राज्यांत अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  यमुना व अन्य नद्या दुथडी भरून वाहत असल्याने दिली, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात पुराचा इशारा दिला आहे. यमुनेवरील हाथिनी कुंड धरणातून ८.२८ लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने हरियाना सरकारने लष्कराला तयारीत राहण्याची सूचना दिली आहे.  पावसामुळे हिमाचल प्रदेशात आतार्पंयत दोन नेपाळी नागरिकांसह २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४३ झाली असल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज दिली. उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण बेपत्ता आहेत. पंजाबमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे. दिल्लीत खबरदारी हरियानातील हथिनी धरणातून यमुनेत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले असल्याने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना दिल्ली प्रशासनाने उभारलेल्या निवारा केंद्रात आश्रय घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. यमुनेची पाणी पातळी सकाळी २०४.८ मीटरपर्यंत पोचली होती. २०१८ मध्ये ही पातळी २०६.०५ मीटर होती. १९७८ मध्ये यमुना नदीचे पाणी २०७.४ मीटरवरून वाहत होते. 

बंगालमध्ये सुधारणा; ओडिशात पावसाचा इशारा कोलकाता ः पश्‍चिम बंगालमधील कोलकात्यासह अन्य भागात पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीत सुधारणा होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथे मुसळधार पाऊस पडून अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. पश्‍चिम बंगालचे शेजारील ओडिशात पुराचा धोका मागे घेतला आहे. मात्र पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दिल्ली

  •   २१२० निवारा केंद्रे उभारली आहेत.
  •   २३ हजार ८०० नागरिकांचा आश्रय
  •   यमुनेवरील 'लोहा पूल' बंद
  • हिमाचल प्रदेश

  •   भूस्खलनामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला
  •   शेकडो पर्यटक व स्थानिक अडकले
  •   रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळित
  •   सिमला, सोलन, कुल्लू, बिलासपूर जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये बंद
  •   हमीरपूर जिल्ह्यात वाहून गेलेल्या दोन शिक्षक व एका विद्यार्थ्याची सुटका
  •   साई राम महाविद्यालयाची इमारत कोसळली
  • उत्तराखंड

  •   ढगफुटीत नऊ जणांचा मृत्यू, २२ बेपत्ता
  •   उत्तर काशी जिल्ह्यातील मोरी भागात अनेक गावांत पूर; घरे वाहून गेली
  •   डेहराडून जिल्ह्यात मोटार नदीत पडून एक महिला वाहून गेली
  • उत्तर प्रदेश

  •   गंगा, यमुना, घागरा या नद्या दुथडी
  •   बदॉंऊ, गरमुक्तेश्‍वर, फरुखाबाद येथे गंगेने धोक्‍याची पातळी ओलांडली
  •   शारदा, घागरा नद्यांनी पूररेषा ओलंडली
  •   गंगा, यमुना काठावरील घरे पाण्याखाली
  • पंजाब

  •   राज्यातील काही भागांत पूरस्थिती
  •   काही रेल्वे गाड्या रद्द तर काही दुसऱ्या मार्गाने वळविल्या
  •   सतलज नदीजवळील भागात दक्षता
  • केरळ, कर्नाटकमधील बळींची संख्या १९७ बंगळूर/वायनाड ः कर्नाटकमध्ये आलेले पुरातील बळींची संख्या ७६ वर पोचली आहे, तर दहा जण बेपत्ता आहेत. केरळमधील बळींची संख्या १२१ झाली आहे. वायनाड जिल्ह्यात दरडी कोसळल्याच्या घटनांमधील मृतदेह अजून सापडत आहेत. केरळमधील मल्लपुरममधील कवलपारा आणि वायनाड जिल्ह्यातील पुथुमला येथील दरडीखालील मृतदेहांचा शोध घेण्यासाठी जमीन भेदक रडारचा वापर केला जात आहे. कर्नाटकमध्ये ५०० निवारा केंद्र अजूनही सुरू असून दोन लाख नागरिकांना निवारा अन्न व पाणी पुरविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तमिळनाडूसह शेजारील राज्यांत पुढील दोन दिवसांत मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

    केरळमधील मदत :

  • २९६ : निवारा केंद्र सुरू
  • ४७, ००० : निवारा केंद्रातील नागरिक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT