truck
truck 
मुख्य बातम्या

हिवरेबाजारमधून जड वाहतूक 

टीम अॅग्रोवन

नगर ः देशात लॉकडाऊन असल्याने भाळवणी-पारनेर व विळद बाह्यवळण रस्ते बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील अवजड वाहतूक हिवरेबाजारमधून होऊ लागली आहे. या वाहतुकीमुळे हिवरेबाजारमध्ये नागरी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही अवजड वाहतूक त्वरित थांबवावी, अशी विनंती हिवरेबाजार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. 

गेली ३० वर्षे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आदर्श गाव हिवरेबाजार उभे केले. येथील रस्ते १० ते १२ वर्षे होऊनही सुस्थितीत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे भाळवणी- पारनेर व विळद बाह्यवळण रस्त्यांवर नाकेबंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक हिवरेबाजारमार्गे होत आहे. त्यामुळे हिवरेबाजारचे रस्ते लवकर खराब होण्याची भीती आहे. हिवरेबाजार गावठाणाअंतर्गत सर्वत्र फूटपाथ केले असून, फूटपाथवरून अवजड वाहने गेल्यास पेव्हर ब्लॉक तुटतात. तसेच, रस्त्यावरच्या उंच वाहनांच्या वाहतुकीमुळे तीन ते चार वेळा विद्युत तारा तुटल्या होत्या. जड वाहतूक सुरू राहिल्यास चार महिन्यांत संपूर्ण रस्ते खराब होतील. रस्तेदुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच कोटी खर्च येईल. मात्र, निधीअभावी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करता येणार नाहीत. त्यामुळे अवजड वाहतूकदारांनी हिवरेबाजारमधून अवजड वाहतूक करू नये, अशी विनंती केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT