रत्नागिरी, संगमनेर तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी Heavy showers in Ratnagiri, Sangamner taluka
रत्नागिरी, संगमनेर तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी Heavy showers in Ratnagiri, Sangamner taluka 
मुख्य बातम्या

रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : हवामान विभागाच्या अंदाजानुसार अतिवृष्टी नाही, मात्र जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला. उक्षी (ता. रत्नागिरी) येथे घराजवळ दरड कोसळल्याने दोन कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. पावसामुळे माती घरंगळणे, रस्त्यावर पाणी येणे, या सारखे प्रकार ठिकठिकाणी घडत होते. रविवारीही संततधार पाऊस सुरू होता. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५४.४४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात रत्नागिरीत १०४.६० मिमी पाऊस नोंदला गेला. पावसामुळे उक्षी येथील स्वप्नाली सिद्धार्थ कांबळे यांच्या घराजवळ दरड कोसळली. हा प्रकार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. यांच्या घराच्या वरच्या बाजूला सुनील कांबळे यांचे घर आहे. त्यांच्या अंगणाच्या भागाची दगड, माती घरंगळत खाली आली. स्वप्नाली यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीच्या दरवाज्यावर माती, दगड पडून आत आले. यामध्ये नुकसान झालेले नसले तरीही घराला धोका निर्माण झाला आहे. तहसील प्रशासनाने दोन्ही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. वरवडे येथील प्रकाश खेडेकर आणि रवींद्र खेडेकर यांच्या घरामागे दरड कोसळली. मंडणगड तालुक्यात दोणारी-वडवली रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद होता. बांधकाम विभागाने दरड हटवून रस्ता सुरळीत केला. दापोली येथे मिलिंद तुकाराम खोपटकर यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे घराचे अंशत: ५ हजार ३९५ रुपयांचे नुकसान झाले. दाभोळ येथे विजय बोरघरे यांच्या घराचा बांध ढासळल्याने शेजारील रामचंद्र बोरघरे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात माउकी येथे संतोष घाणेकर यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले.  नांदिवसे-राधागनर येथे विनायक शिंदे यांच्या गोठ्याला अचानक आग लागून खाक झाला. राजापूर तालुक्यात दोनिवडे येथे बाळू भागाजी पवार यांच्या घराचे पावसामुळे अंशत: १ लाख १५ हजार रुपयांचे तर चुनाकोळवण येथील लक्ष्मण तानाजी मटकर यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT