Heavy rains in Turkabad Mandal in Aurangabad
Heavy rains in Turkabad Mandal in Aurangabad 
मुख्य बातम्या

औरंगाबादमधील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर काही मंडळांत शुक्रवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर, इतर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ३७ , जालन्यातील ३, बीडमधील ३०, लातूरमधील २५, हिंगोलीतील पाच, नांदेडमधील २१, उस्मानाबादमधील ३३, तर परभणीतील १२ मंडळांत तुरळक पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३ मंडळांत पावसाची तुरळक हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील ३० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. 

अंबाजोगाई तालुक्यातील देवळा परिसरात गुरुवारी (ता.३) दुपारी साडेचार वाजता जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे उभा ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

रेणापूर तालुक्यात जोर 

लातूर जिल्ह्यातील २५ मंडळांत पावसाची हजेरी लागली. रेणापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यातील पळशी मंडळात सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील पाच मंडळांत तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २१ मंडळांत तुरळक ते हलक्‍या पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव मंडळात सर्वाधिक ४०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात हलका पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT