Heavy rains in Surwade area
Heavy rains in Surwade area 
मुख्य बातम्या

सुरवाडे परिसरात अतिमूसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन

जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात सोमवारी (ता. १३) रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पावसामुळे सुरवाडे पंचक्रोशीतील सुमारे ४० ते ५० एकर शेतीतील कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके अक्षरशः वाहून गेली. पावसाचा जोर इतका प्रचंड होता, की शेतांचे बांध फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

पाचोरामधून वाहणाऱ्या हिवरा नदीला पूर आला. कृष्णापुरी भागातील पुलावरून पाणी वाहत आहे. पुरामुळे कृष्णापुरी भागाचा संपर्क तुटला असून, नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले.  मराठवाड्यातील काही भागात गेल्या आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील हिवरा धरण ओसांडले आहे. त्यामुळे हिवरा नदी दुथडी भरून वाहत आहे.  पुरामुळे कृष्णापुरी भागातील हिवरा नदी पुलावरून सुमारे दोन फूट पाणी वाहत आहे. यामुळे पुलावरून होणारी वाहतूक पूर्णतः थांबली. त्यामुळे कृष्णापुरी परिसराचा संपर्क तुटला.

नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून बसस्थानकाकडून शहरात ये-जा करावी लागली. पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलवनस्पती वाहून आली आहे. दोन दिवसांपूर्वीच या नदीत बुडून नुरानीनगरातील दोन बालकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीती कायम आहे. सुरवाडे खुर्द परिसरात मुसळधार पाऊस झाला. अंकुरलेली पिके वाहून गेली. काही शेतकऱ्यांचा कापूस वाहून गेला. कापसाच्या शेतातील ठिबक सिंचन संच वाहून गेले.  

तहसिलदारांनी मंगळवारी (ता. १४) सकाळी सुरवाडे खुर्द परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे झाले आहेत. पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती तहसिलदारांनी दिली. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

पशुधनाची हानी 

सुरवाडे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची देखील हानी झाली आहे. सुरवाडे येथील शेतकरी प्रकाश कडू पाटील यांचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला. हा बैल नाल्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळला आहे. तहसिलदारांनी या घटनेचाही पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्याला दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT