Heavy rains in many parts of Nashik district
Heavy rains in many parts of Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१०) दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर दिसून आला. त्यात प्रामुख्याने निफाड, सिन्नर व सटाणा तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद सटाणा तालुक्यातील मुल्हेर मंडळात (७२ मिमी) झाली. निफाड तालुक्यातील ओझर मंडळात (५३ मिमी), तर सिन्नर तालुक्यातील वावी मंडळात (४७ मिमी) पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. परिणामी, काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसात जिल्ह्याच्या पूर्व भागातील लगतच्या तालुक्यामध्ये जोर अधिक होता. यासह निफाडसह चांदोरी, सायखेडा,रानवड, नांदूर मधमेश्वर, पिंपळगाव बसवंत परिसरात पावसाने हजेरी लावली. अनेक भागात द्राक्ष भागातून पाणी वाहिले.यासह सिन्नर सह ग्रामीण भागात पांढुर्ली, नांदूर शिंगोटे, तर पूर्व भागात वावी, देवपूर भागात जास्त पाऊस होता.

सटाणा तालुक्यात मुल्हेर परिसरात मुसळधार पाऊस झाला. तसेच विरगाव, ताहाराबाद, डांगसौंदाणे या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात प्रामुख्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यात पालेवर्गीय भाज्यांमध्ये मेथी व कोथिंबिरीचे नुकसान झाले.

पेठ तालुक्यामध्ये जोगमोडी व कोहोर मंडळात मध्यम पाऊस झाला. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अभोना, कणाशी, दळवट परिसरात पावसाने हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील पश्चिम भागात वडनेर भैरव परिसरात पावसाचा जोर होता. इगतपुरी, सुरगाणा, देवळा व त्र्यंबकेश्वर मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. नाशिक व दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. येवला व नांदगाव तालुक्यात पावसाने उघडीप दिली.

कांदा लागवडीवर परिणाम

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मका, बाजरी, कापूस व सोयाबीन  पिकांचे नुकसान झाले. त्यात लेट खरीप व उन्हाळ कांद्याचे रोप खराब होत आहे. त्यामुळे आगामी कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT