dam
dam  
मुख्य बातम्या

वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर पाऊस 

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा, खानदेशासह, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात सर्वदूर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर कोकण, विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. वऱ्हाडात बहुतेक ठिकाणी मंगळवारी (ता.११) जोरदार पाऊस सुरु होता. तर, मराठवाड्यातही हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. 

दरम्यान, मंगळवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे सर्वाधिक १८५.५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. सिंधुदुर्गामधील वेंगुर्ला, रत्नागिरीतील राजापूर, गुहागर, रायगडमधील रोहा येथे मुसळधार सरी पडल्या. त्यामुळे भात खाचरे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. मंगळवारी दिवसभर या भागात ढगाळ हवामानासह अधूनमधून सरी पडत होत्या. मध्य महाष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. मात्र, पूर्व भागातही पावसाने दिलासा दिला आहे. 

कोल्हापूरमध्ये गगनबावडा येथे ९६ मिलिमीटर पाऊस पडला असून धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने पाण्याची वाढ कायम आहे. यात राधानगरी, जंगमहटी, घटप्रभा, जांबरे, कोदे आदी प्रकल्पांचा समावेश आहे. चित्री प्रकल्प ९४ टक्के, कडवी प्रकल्प ९० टक्के, तुळशी, वारणा, दुधगंगा कासारी आदी धरणात सरासरी ८५ टक्के पाणी साठा झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वारणा (चांदोली)  व राधानगरी धरणातून ४२०० क्यूसेक, दूधगंगा धरणातून १८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर,नगर जिल्ह्यासह, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतही पावसाने चांगली हजेरी लावली.  मराठवाड्यात दिलासा  मराठवाड्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील बहुतांशी भागात हलक्या सरी कोसळल्या. नांदेडमधील माहूर येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे दोन ते अडीच महिने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.  विदर्भात ठिकठिकाणी मुसळधार  विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गडचिरोली येथे ९६.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर दिग्रस, मालेगाव, कुरखेडा, भिवापूर, मेहकर अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. पश्चिम विदर्भात पावसाने आत्तापर्यंत अनेकवेळा हुलकावणी दिली. मात्र, या भागातही पावसाने बऱ्यापैकी जोर धरल्याने शेतकरी सुखावला  आहे. 

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेले ठिकाणे  महाड १३८, वेंगुर्ला ११९.२, राजापूर ११८, गुहागर १०६, रोहा १०५, तळा १०१. पावसाने दिलासा 

  • राज्यात सर्वदूर हलक्या सरी 
  • खानदेश व मराठावाड्यात पिकांना दिलासा 
  • कोल्हापूर जिल्ह्यातील पाच प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरले. 
  • पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस 
  • कोकणात ठिकठिकाणी मुसळधार 
  • वऱ्हाडात अनेक ठिकाणी पावसाने झोडपले 
  • मंगळवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांता झालेला पाऊस (मिलिमीटर)  कोकण ः मोखेडा ३५.८, पालघर ३२, विक्रमगड ६१, वाडा ८३, भिरा ४७, कर्जत ७०.८, खालापूर ६७, माणगाव ४९, माथेरान ७९.६, म्हसळा ३२, मुरूड ५०, पनवेल ३१.६, पेण ६०, पोलादपूर ७६, सुधागडपाली ७०, चिपळूण ६०, हर्णे ६३.४, लांजा ९८, मंडणगड ७०, संगमेश्वर ९४, देवगड, दोडामार्ग ८४, कणकवली, कुडाळ ८५, मालवण ८६, रामेश्वर ६३.४, सावंतवाडी ७५, वैभववाडी ६९, भिवंडी ३०, कल्याण ३४.  मध्य महाराष्ट्र : मुक्ताईनगर ४५, रावेर ३२, यावल ३१.४, पन्हाळा ३४, शाहूवाडी ४८, शिरोळ ३५, भोर ३०, लोणावळा कृषी ६३, पौड ३०, सांगली ३१.४, पाटण ४१, महाबळेश्वर ६६.२.  मराठवाडा ः औरंगाबाद ३१.६, हिंगोली ४०, कळमनुरी ४६, सेनगाव ४१, भोकरदन ४२, जाफ्राबाद ४३, चाकूर ३८, रेणापूर ३६, अर्धापूर ३६, हादगाव ३८, , माहूर ८०, भूम ४०, जिंतूर ३३.  विदर्भ ः लाखंदूर ३६, पवनी ९२.२, साकोली ३७.२, बुलडाणा ४४, चिखली ४७, देऊळगाव राजा ३९.६, लोणार ४६, मलकापूर ४१.४, मेहकर ४५.९, नांदुरा ३१.८, सिंदखेड राजा ४६, चंद्रपूर ३४.८, चिमूर ३६.९, सावळी ४६.६, सिंदेवाही ४८.३, अहेरी ५२, भामरागड ७४.६, चामोर्शी ३७.९, देसाईगंजवडसा ३१.५, धानोरा ४८.४, एटापल्ली ४८.४, गडचिरोली ९६.८, कुरखेडा ५२.२, सिरोंचा ३४.३, अर्जुनीमोरगाव ३९.६, गोरेगाव ४४.२, सडकअर्जुनी ३१.१, भिवापूर ५१.५, मालेगाव ६४.९, मानोरा ५४, वाशिम ५३.३, अर्णी ४७.३, दिग्रस ६९.९, महागाव ४८.९, पुसद ३६.३.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT