पावसामुळे रांधे येथील पुलावरुन पाणी वाहिले
पावसामुळे रांधे येथील पुलावरुन पाणी वाहिले  
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी 

टीम अॅग्रोवन

नगर  ः हस्त नक्षत्राच्या उत्तरार्धात शुक्रवारी नगर तालुक्‍यातील पूर्व भागात, तर शनिवारी पश्‍चिम भागात दमदार पाऊस झाल्याने ज्वारीसह इतर पिकांना आधार मिळाला आहे. नवरात्रोत्सवात काही गावांत पाचव्या आणि सातव्या माळेला मोठ्या यात्रा भरतात. गेल्या दोन-तीन दिवसांच्या पावसाने या यात्रोत्सवावर परिणाम झाला. श्रीरामपूर, बेलापूर, संगमनेर येथे अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. 

नगर तालुक्‍यातील पूर्व भागातील कौडगाव, पिंपळगाव, भातोडी-पारगाव, दौला वडगाव, आठवड, चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण, टाकळीकाझी भागांत चांगला पाऊस झाला. कामरगाव, चास, भोयरे पठार, निमगाव वाघा, अकोळनेर, सोनेवाडी-चास, अरणगाव भागांतही चांगला पाऊस झाला. या पावसाने काढणीला आलेल्या बाजरीच्या पिकाला काहीसा फटका बसल्याने शेतकरीवर्ग नाराज होता. मात्र, तालुक्‍यातील ज्वारीच्या पिकास फायदा होणार आहे. 

पारनेर तालुक्यातील निघोज, चोंभूत, रेनवडी, म्हस्केवाडी, अळकुटी, वडनेर बुद्रुक, रांधे परिसरात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. शनिवारी (दि. ५) झालेल्या पावसाने चोंभूत-रेनवडी रस्त्यावरील पूल वाहून गेला. बऱ्याच ठिकाणी नवीन लागवड केलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले. पठारवाडी, गाडीलगाव-गुणोरे, जवळे परिसरात संध्याकाळपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने कांदा, तूर, मका व इतर काही पिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी कांद्याची रोपे लागवडीला पाणी नाही. त्यालाही आधार मिळाला आहे.श्रीरामपूर शहरासह परिसरातील बेलापूर, उक्कलगाव, खंडाळे, अशोकनगर, उंबरगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव, वळदगाव या परिसरातही पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पाणी आले होते. 

या हंगामात प्रथमच मोठा पाऊस झाला. सध्या शेतात सोयाबीन, मक्‍यासारखी पिके असून, त्याचे पावसाने नुकसान झाले आहे. मात्र, रब्बीच्या पेरण्यांसाठी पाऊस फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राहाता तालुक्यातील पुणतांबा, लोणी, बाभळेश्वर परिसरातही पावसाने हजेरी लावली. नगर शहरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसात तारकपूर बसस्थानकासमोरील अर्जुन नेत्रालयाच्या छतावर वीज कोसळली. शनिवारी ही घटना घडली. यात नेत्रालयासह जवळील पाच हॉस्पिटलच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे सुमारे दोन लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यांतील काही भागांत पाऊस झाला. 

रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत झालेला पाऊस मिमी ः बेलवंडी ः ८, मांडवगण ः ८, श्रीरामपूर ः १०८, बेलापूर ः ६७, पुणतांबा ः ५८, बाभळेश्वर ः १८, लोणी ः ३९, शिर्डी ः ११, टाकळीमानूर ः १२, मिरी ः १२, शेवगाव ः १०, चापडगाव ः १६, सुपा ः ११, संगमनेर ः ६७, तळेगाव ः १२, समनापूर ः २०, ब्राह्मणवाडा ः ४०, रवंदे ः ३७.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT