Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने जोरदार सरी येत आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  गुजरात आणि परिसरावर असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत असून, ते पश्‍चिमेकडे सरकून गेले आहे. तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची पूर्वेकडील बाजू हिमालयाच्या पायथ्याकडे सरकली आहे, हा आस पंजाबच्या अमृतसरपासून बिहारच्या भागलपूरपर्यंत विस्तारला आहे. तर पश्‍चिम किनाऱ्याला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कर्नाटकपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत कायम आहे.  कोकणात सर्वदूर पाऊस पडणार असून, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटमाथा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी येणार आहेत. तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT