Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय स्थिती तयार होत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

बंगालच्या उपसागरात बुधवारी (ता.२८) कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून बाष्प पूर्व भागाकडे खेचले जाण्याची शक्यता आहे. सध्या या भागात चक्रिय स्थिती असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात मॉन्सूनचा ट्रफ गंगानगर, हिस्सार, दिल्ली, अलिगड, फुरसतगंज, गया, बंकुरा ते बंगाल उपसागराचा वायव्य भागापर्यंत सक्रिय आहे. पुढील चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. 

सध्या राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश भागात पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे. कमाल तापमानासह किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत चंद्रपूर येथे ३३.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.  येथे होणार जोरदार पाऊस  मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  बुधवार ः रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  गुरुवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर संपूर्ण विदर्भ  शुक्रवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर संपूर्ण विदर्भ  ---------------------------------------------------  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २७.६ (०.२) 
  • जळगाव - २८.६ (-२.७) 
  • कोल्हापूर - २८.० (१.८) 
  • महाबळेश्वर - १९.८ (०.२) 
  • मालेगाव - ३०.४ (०.४) 
  • नाशिक - २६.० (-१.४) 
  • सांगली - २४.२ (-४.५) 
  • सातारा - २७.० ( ०.८) 
  • सोलापूर - ३२.८ (१.७) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.४ (०.६) 
  • अलिबाग - ३०.५ (०.८) 
  • रत्नागिरी - २९.३ (०.९) 
  • डहाणू - ३१.२ (०.९) 
  • औरंगाबाद - २७.३ (-१.७) 
  • परभणी - ३०.७ 
  • नांदेड- ३२.० (०.७) 
  • अकोला - २९.५ (-१.३), 
  • अमरावती - २७.८ (-२.२) 
  • बुलडाणा - २९.६ (१.८) 
  • ब्रम्हपुरी - ३२.८ (२.६) 
  • चंद्रपूर - ३३.८ (२.८) 
  • गोंदिया - ३१.२ (०.२) 
  • नागपूर - ३१.८ (१.२) 
  • वर्धा - ३०.० (-०.३)   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

    Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

    SCROLL FOR NEXT