सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज  
मुख्य बातम्या

सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समुद्रात पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारला आहे. या पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागल्याने कोकणातील पावसाचा प्रभाव काहीसा कमी होण्याची स्थिती आहे. तर फिरोजपूर, रोहतक, अलिगड, चुर्क, रांची बालासोर या भागात मॉन्सूनचा ट्रफ असून, बंगाल उपसागराच्या वायव्य भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. ही पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

सध्या राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे. कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे हवेत गारवा तयार झाला आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे ३० अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.  येथे होणार जोरदार पाऊस  शुक्रवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, वाशीम, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ.  शनिवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती.  रविवार ः ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.  सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २८.१ (०.१) 
  • जळगाव - ३४.२ (१.७) 
  • कोल्हापूर - २४.७ (-२.१) 
  • महाबळेश्‍वर - १९.४ (-०.४) 
  • मालेगाव - २५.६ (-५.३) 
  • नाशिक - २५.९ (-२.६) 
  • सांगली - २६.७ (-२.२) 
  • सातारा - २६.८ (-०.१) 
  • सोलापूर - २९.२ (-२.५) 
  • मुंबई (कुलाबा) - ३१ (१.१) 
  • अलिबाग - २७.२ (-२.८) 
  • रत्नागिरी - २७.४ (-१.६) 
  • डहाणू - २९.६ (-०.९) 
  • औरंगाबाद - २८.४ (-१.४) 
  • परभणी - ३२ (०.४) 
  • बीड- ३०.८ (१) 
  • अकोला - ३०.८ (-१.४), 
  • अमरावती - २९.४ (-०.९) 
  • बुलडाणा - २८.२ (-०.७) 
  • गोंदिया - ३२.० (०.८) 
  • नागपूर - ३०.८ (-०.२) 
  • वर्धा - ३१.२ (०.५)  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

    Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    SCROLL FOR NEXT