Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात जोरदार सरी शक्य 

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्राचा पश्‍चिम भाग ते ओमानच्या दक्षिण भागांत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भात पुढील पाच ते सहा दिवस जोरदार, तर मराठवाड्याच्या दक्षिण भागात आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

कोकणात अंशतः ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्रातही काहीसे ऊन असल्याने अधूनमधून ढग भरून येतात. त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मराठवाडा व विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून  राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहे. शनिवारी (ता. २६) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

राज्यात होत असलेल्या पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. कोकणातील अलिबाग येथे सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसची घट होऊन २६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या भागात २५ ते ३० अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात १९ ते ३५, मराठवाड्यात ३१ ते ३३, विदर्भात ३१ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  मॉन्सून पुढील आठवड्यात सक्रिय होणार  गेल्या आठ दिवसांत मॉन्सूनमध्ये कोणतीही फारशी प्रगती झालेली नाही. मात्र येत्या पाच ते सहा दिवसांत मॉन्सूनला सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राजस्थान, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली या भागांत मॉन्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत मॉन्सून आणखी काही भागांत मजल मारण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस  रविवार ः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, संपूर्ण विदर्भ  सोमवार ः जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, संपूर्ण विदर्भ  मंगळवार ः संपूर्ण विदर्भ  बुधवार ः संपूर्ण विदर्भ  शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) २९.५ 
  • अलिबाग - २६.९ 
  • रत्नागिरी - २८ 
  • डहाणू - २५.८ 
  • पुणे - २७.६ 
  • जळगाव - ३५ 
  • कोल्हापूर - २६.२ 
  • महाबळेश्‍वर - १९.२ 
  • मालेगाव - ३२.८ 
  • नाशिक - २७.९ 
  • सांगली - २८.९ 
  • सातारा - २७.३ 
  • सोलापूर - ३१.२ 
  • औरंगाबाद - ३१.७ 
  • परभणी -- ३३.१ 
  • अकोला - ३३.८ 
  • अमरावती - ३४ 
  • बुलडाणा - ३१.२ 
  • ब्रह्मपुरी - ३१.६ 
  • चंद्रपूर - ३३.२ 
  • गोंदिया - ३१ 
  • नागपूर - ३१.७ 
  • वर्धा - ३२.५   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT