सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video सुद्धा)
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video सुद्धा) 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video सुद्धा)

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता.१९) दुपारी तीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्याच्या पुर्वपट्टयात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे कोरडे पडलेले नदी, नाले वाहु लागले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसु लागले आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्गात मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. बुधवारी सकाळीदेखील चांगला पाऊस झाला. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. परंतु दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्हयाच्या पुर्वपट्टयात पावसाचा जोर अधिक होता. विशेषतः वैभववाडी, कणकवलीला मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी परिसरात पडत असलेला पाऊस.. पहा Video देवगड,कुडाळ या भागात देखील पावसाच्या सरी कोसळल्या. सांवतवाडी, मालवण, वेंगुर्ला या भागात तुरळत सरी कोसळल्या.ज्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तेथील नदी, नाले प्रवाहीत झाले आहेत. या पावसामुळे शेतीच्या कामांचा वेग वाढणार आहे. मागील चार दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. परंतु बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT