आंबेगाव तालुक्यात तरकारी पिकांचे नुकसान
आंबेगाव तालुक्यात तरकारी पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

आंबेगाव तालुक्यात तरकारी पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात दहा ते १२ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका लौकी, कळंब, चास, महाळुंगे पडवळ आदी गावांतील शेतकऱ्यांना बसला आहे. 

पावसामुळे सूर्यदर्शन होत नाही, तसेच दररोज कोसळत असलेल्या सरींमुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी पिके सडू लागली आहेत. तसेच, किडीचा उपद्रव वाढला आहे. मार्च ते एप्रिलदरम्यान टोकन पद्धतीने लागवड केलेल्या भुईमूग पिकाची काढणीची कामे रखडली आहेत. वेळेत काढणी न झाल्यास भुईमूगाच्या शेंगांना जमिनीतच मोड येण्याची शक्‍यता आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला, तर भुईमूग शेंगाचे नुकसान होऊन भुईमूग पीक वाया जाण्याचा धोका आहे, असे रामचंद्र थोरात, आदिनाथ थोरात व राजाराम थोरात यांनी सांगितले. 

कळंब येथील शेतकरी संजय कानडे व आकाश  अर्जुन कानडे यांच्या एक एकर क्षेत्रातील फ्लॉवर पिकात पाणी साचत असल्याने पीक सडू लागले आहे. त्यांनी बियाणे, खते, औषधे असा एकूण पन्नास हजार रुपये खर्च केला होता. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद कानडे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT