नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे पावसामुळे मोठे नुकसान 
नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे पावसामुळे मोठे नुकसान  
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेली कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍युसेकने विसर्ग सुरूच आहे. पूरस्थिती थोडी कमी झाली असली, तरी प्रश्न सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर पूर कायम असलेल्या भागात नुकसानीचे पंचनामे होणे बाकी आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर बुधवार (ता. ७) पासून पूर कमी झालेल्या भागात पंचनाम्यांना सुरवात झाली. त्यामुळे बाधित झालेल्या कुणालाही निवारा शेडमधील भोजन व्यवस्था वगळता कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळालेली नाही. अजूनही बराच भाग पाण्यात असल्याने नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट व्हायला आणखी दोन दिवस लागतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

गंगापूर, दारणा आणि पालखेड अशा तिन्ही प्रमुख समूहांतील धरणालगतच्या दीडशेहून अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव, पेठ या पाच तालुक्‍यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये पुरामुळे कोलमडलेली वीज व पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत झालेली नाही. 

नांदूर मध्यमेश्‍वर धरणातून २९ हजार ५९४ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असून, विस्थापितांच्या व्यवस्थेत व्यस्त यंत्रणेकडून अजून पूर्ण क्षमतेने पंचनामे झाले नसून, याबाबत कामकाज संथगतीने सुरू आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदांसाठी येत्या १० ऑगस्टपासून राज्यभरात ‘महापरीक्षा’द्वारे परीक्षा पार पडणार होत्या. नाशिक जिल्ह्यात या परीक्षा १३ ऑगस्ट रोजी पार पडणार होत्या. मात्र, अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे पूरस्थितीशी सामना करत आहे, जनजीवन विस्कळित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महापरीक्षाचे प्रकल्प व्यवस्थापक दिनेश पाटील यांना शासनाने पत्र पाठवत नियोजित सर्व परीक्षा १९ ऑगस्टनंतर घेण्याचे आदेश दिले आहेत.

पाच तालुक्‍यांना पुराचा फटका जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांना पुराचा फटका बसला आहे. त्यात निफाड दोन हजार ५२२, नाशिक ३ हजार ३९, बागलाण ३४५, मालेगाव ३६, पेठ १३ यांसह लहान-मोठ्या गावांत एकूण पाच हजार ६४० कुटुंबे बाधित झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT