अकोला, ब्रह्मपुरीत उष्णतेची लाट
अकोला, ब्रह्मपुरीत उष्णतेची लाट 
मुख्य बातम्या

अकोला, ब्रह्मपुरीत उष्णतेची लाट

टीम अॅग्रोवन

पुणे : उन्हामुळे अंगाची काहीली होत असतानाच रविवारी (ता. ६) दुपारनंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत दुपारी तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात सायंकाळनंतर पूर्वमोसमीच्या सरी कोसळल्या. तर विदर्भात उन्हाचा चटका वाढत, सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, ब्रह्मपुरी येथे उष्णतेची लाटेसह देशातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीलगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या भागात ढग गोळा होत आहेत. सोमवारी दुपारनंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात ढग गोळा झाले होते. तसेच लातूर, नांदेड, वाशिम जिल्ह्यातही अंशत: ढगाळ हवामान होते. उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे पारा ४४ अंशांच्या असपास आहे. गुरुवारपर्यंत (ता. १०) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान राहणार आहे. तर विदर्भात अालेली उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.३, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४४.४, नाशिक ३९.३, सांगली ३९.९, सातारा ४०.१, सोलापूर ४२.६, मुंबई ३४.२, अलिबाग ३६.४, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३४.७, औरंगाबाद ४१.६, परभणी ४४.०, नांदेड ४३.०, अकोला ४५.१, अमरावती ४४.०, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४२.५, नागपूर ४३.७, वर्धा ४४.९, यवतमाळ ४३.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT