OCTOBER-HIT
OCTOBER-HIT 
मुख्य बातम्या

उन्हाचा चटका कायम राहणार

टीम अॅग्रोवन

पुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहतांशी ठिकाणी तापमान तिशीपार गेल्याने चटका असह्य होत आहे. किमान तापमानही १५ अंशांच्या पुढे गेल्याने गारठा नाहीसा झाला आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून थंड व कोरडे वारे दक्षिणेकडे न आल्याने राज्यात यंदा थंडीचा कडाका कमी आहे. यात पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम, दोन्ही समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, कोकणातही ढगाळ हवामान झाले. यामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली. गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यत: निरभ्र हवामान असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत आहे. पहाटेच्या वेळी काही ठिकाणी धुके पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. १६) नागपूर येथे राज्यातील नीचांकी १२.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ ते २० अंशांदरम्यान पोचले आहे.   रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८(१५.७), नगर ३५.४, धुळे ३२.०(१३.०), जळगाव ३३.८(१५.०), कोल्हापूर ३२.७(१९.७), महाबळेश्‍वर २९.५(१७.२), मालेगाव ३३.२(१६.२), नाशिक ३२.१(१५.०), निफाड ३२.०(१२.४), सांगली ३४.५(१७.८), सातारा ३३.०(१६.५), सोलापूर ३५.२(२०.०), डहाणू २९.८(१९.२), सांताक्रूझ ३३.३(१९.२), रत्नागिरी ३२.९(१९.३), औरंगाबाद ३२.७(१७.३), परभणी ३३.२(१६.४), नांदेड -(१५.०), अकोला ३४.८(१४.९), अमरावती  ३२.६(१६.६), बुलडाणा ३०.०(१५.२), चंद्रपूर ३३.५(१५.२), गोंदिया ३०.०(१३.४), नागपूर ३२.८(१२.१), वर्धा  ३४.०(१५.६), यवतमाळ ३१.५(१६.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT