Heatwave
Heatwave  
मुख्य बातम्या

विदर्भात उष्ण लाट 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाच्या झळा वाढून अंगाची लाही होत आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूरात हंगामात प्रथमच तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्ण लाट आली आहे. शनिवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूरात हंगामातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२४) विदर्भातील उष्ण लाट कायम राहणार आहे, तर मराठवाड्यासह उर्वरीत राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्यास त्या भागात उष्ण लाट आल्याचे समजण्यात येते. शनिवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि अकोल्यात ४५ अंशापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर राजस्थानमधील चुरू येथे देशातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा येथेही तापमान ४४ अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा झळा असह्य होत आहेत. आज (ता. २४) राज्यात ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८, धुळे ४३.०, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्‍वर ३०.६, मालेगाव ४३.२, नाशिक ३७.९, निफाड ३९.३, सातारा ३८.६, सांगली ३८, सोलापूर ४३.३, डहाणू ३४.६, सांताक्रूझ ३४.५, रत्नागिरी ३४.९, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.२, नांदेड ४३.५, अकोला ४५.२, अमरावती ४४.२, बुलडाणा ४१.४, ब्रह्मपुरी ४२.५, चंद्रपूर ४५.५, गोंदिया ४४.२, नागपूर ४५.६, वर्धा ४४.५.  मॉन्सूनची चाल होईना  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. उत्तरेकडे सरकत जाऊन वादळ निवळल्यानंतर मात्र मॉन्सूनने आणखी चाल केलेली नाही. अम्फानने ओढून नेलेले बाष्प व प्रभावीत केलेले वाऱ्याचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनच्या अंदमानातील पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे. तर यंदा केरळात मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार असून, ५ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे.    उन्हाचा चटका तापदायक ठरणारी ठिकाणे : नागपूर ४५.६, चंद्रपूर ४५.५, अकोला ४५.२, वर्धा ४४.५, जळगाव ४४.२, परभणी ४४.२, अमरावती ४४.२, गोंदिया ४४.२. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT