तापमान
तापमान  
मुख्य बातम्या

विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : फणी चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत असल्याने तापमानात घट झाली. उन्हाने चटकणाऱ्या महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला. मात्र दोन दिवसांत उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेले काही दिवस राज्याचे कमाल तापमान सरासरीच्या खाली घसरल्याने उन्हाचा ताप, उकाडा कमी होऊन पहाटेच्या वेळी गारठा जाणवू लागला आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही हळूहळू वाढ होत जाणार आहे. शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. आजपासून (ता. ५) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.० (-२.७), जळगाव ४१.० (-१.६), कोल्हापूर ३४.० (-२.९), महाबळेश्वर ३०.१ (-१.३), मालेगाव ४०.६ (०.३), नाशिक ३४.७ (-३.४), सांगली ३६.८ (-१.७), सातारा ३४.९ (-१.७), सोलापूर ३९.२(-१.६), अलिबाग ३५.३ (३.०), सांताक्रूझ ३३.० (-०.१), रत्नागिरी ३३.१ (०.५), औरंगाबाद ३९.१ (-०.४), बीड ४२.५ (२.४), परभणी ४२.० (०.५), नांदेड ४२.५ (०.६), उस्मानाबाद ३९.१ (-०.२), अकोला ४२.१ (०.२), अमरावती ४२.० (-०.३), बुलडाणा ३८.५ (०.१), बह्मपुरी ४५.० (३.०), चंद्रपूर ४४.२ (१.२), गोंदिया ४१.२ (-०.६), नागपूर ४३.६ (१.६), वर्धा ४३.० (०.२), यवतमाळ ४१.५(-०.२). ‘फणी’ चक्रीवादळ ओसरले बंगालच्या उपसागरात आलेले फोणी चक्रीवादळ शुक्रवारी (ता. ३) पुरीजवळ ओडिशाच्या किनाऱ्याला धडकले. ताशी तब्बल १७५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार पावसासह आलेल्या वादळाने ओडिशामध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान केले. जमिनीवर आल्यानंतर पश्चिम बंगालकडे जाताना या वादळाची तीव्रता कमी होत गेली. शुक्रवारी रात्री हे वादळ पश्चिम बंगालमध्ये पोचले. शनिवारी (ता. ३) दुपारी हे वादळ ओसरून बांगलादेशाजवळ तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. वादळामुळे पश्चिम बंगाल, बांगलादेशासह ईशान्येकडील राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT