आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज 
मुख्य बातम्या

आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

टीम अॅग्रोवन

पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ६ तालुके, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ८० गावांच्या कार्यक्षेत्रातून पालख्यांचे पंढरपुराकडे मार्गक्रमण होते. वारीतील वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदने ३५ लाख रुपयांची तरतूद केल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीहून २५ जून रोजी प्रस्थान करून पुणे शहरमार्गे हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हा, नीरा या मार्गे नीरा नदीत पादुका स्नान करुन २ जुलै रोजी पाडेगाव (लोणंद) येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून २४ जून रोजी प्रस्थान करून निगडी, पिंपरी चिंचवडमार्गे पुणे शहरातून हडपसर, लोणी काळभोर, यवत, रोटीघाट, उंडवडी, बारामती, इंदापूरमार्गे सराटी येथे मुक्काम करून ७ जुलै रोजी अकलूज येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. 

वारकऱ्यांना पाय दुखणे, डोके दुखणे, सर्दी होणे यासह जलजन्य आजार,कीटकजन्य आजार, मधुमेह, रक्तदाब या आजारांविषयी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना केल्या जातील. औषधांसाठी २० लाख रुपये, रुग्णवाहिका व टॅंकरच्या इंधनासाठी ८ लाख रुपये; तर प्रसिद्धी, किटस, साहित्य व आरोग्यदूतांसाठी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पालखी मार्गावरील सर्व गावे, वाड्या-वस्त्या यांचे पाणी नमुने, टीसीएल नमुन्यांची तपासणी, टीसीएल उपलब्धता, ३ हजार ६५२ पाणीस्त्रोतांचे पाणी गुणवत्ता सनियंत्रण, ४५ टॅंकर भरण्याच्या ठिकाणांचे सनियंत्रण, १०९१ हॉटेल्सचे स्वच्छता व आरोग्यविषयक तपासणी, मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी आदी प्रतिबंधात्म उपयोजना करण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा

  • पालखी नियोजनाकरिता स्वतंत्र वैद्यकीय पथकांची स्थापना 
  • ११० वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या
  • २४ तास फिरती वैद्यकीय पथके, ३० रुग्णवाहिका 
  • प्राथमिक आरोग्य तपासणी, औषधोपचारासाठी आरोग्यदूत 
  • मुक्कामाच्या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा केंद्र
  • जिल्हा परिषद येथे नियंत्रण कक्ष स्थापन 
  • सर्व दिंडीप्रमुखांना औषधाचे किटवाटप करणार 
  • चित्ररथाद्वारे वारकरी बांधवांना आरोग्यविषयक योजनांची माहिती   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

    Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

    Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

    Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

    Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

    SCROLL FOR NEXT