तुर खेरदी
तुर खेरदी  
मुख्य बातम्या

हमीभावाने तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित

टीम अॅग्रोवन

परभणी ः हमीभावाने खरेदी योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या हंगामात शासकीय केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी सर्वाधिक ११ क्विंटल १५ किलो, तर बीड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी १ क्विंटल एवढी निश्चित करण्यात आली. यंदा हमीभावाने खरेदीसाठी ठरवून दिलेली तुरीची उत्पादकता गतवर्षीपेक्षा कमी आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले. राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह फेडरेशनतर्फे किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी शासनाने जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार तूर खरेदीसाठी मर्यादा निश्चित केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे तूर उत्पादनात घट झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिहेक्टरी उत्पादकता देखील कमी झाली आहे. तुरीचे पीक कापूस आणि सोयाबीन पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात येते. परंतु हमीभावाने खरेदीसाठी तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र गृहित धरून उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  गतवर्षी (२०१७-१८) हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता १९.४५ क्विंटल, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १० क्विंटल ठरवून दिली होती. यंदा परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी ५ क्विंटल, नांदेड जिल्ह्यासाठी ४ .८८ क्विंटल, हिंगोली ४.१० क्विंटल एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. यंदा हमीभावाने खरेदीसाठी कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांतील तुरीची उत्पादकता निश्चित करण्यात आली. अकोला जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक म्हणजे ११ क्विंटल १५ किलो, तर बीड जिल्ह्याची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे १ क्विंटल एवढी आहे. जिल्हानिहाय हेक्टरी उत्पादकता (क्विंटल) परभणी ५, हिंगोली ४.१०, नांदेड ४.८८, लातूर ४.०४, उस्मानाबाद १.९६, बीड १, जालना ७.१२, औरंगबाद २.०८, बुलडाणा ४.५९, अकोला ११.१५, वाशिम १०.१०, अमरावती ९.३४, यवतमाळ ६.८०, वर्धा ६.६७, नागपूर ५.५६, भंडार ५, गोंदिया ७.२०, चंद्रपूर ७.६८, गडचिरोली ५,नाशिक ३.१३, धुळे ५.१२, नंदुरबार २.४४, जळगाव ४.७०, नगर १.८०, पुणे २.१५, सोलापूर १.०२,सातारा ६.२५, सांगली ४.९६, कोल्हापूर १०.५४, रत्नागिरी ४.६२, रायगड ६.५१, पालघर ४.९४, ठाणे ६.०९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT