भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात  To harvest paddy Beginning in Sindhudurg
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात  To harvest paddy Beginning in Sindhudurg 
मुख्य बातम्या

भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात 

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या भातपीक कापणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, शेतशिवारे शेतकऱ्यानी गजबजल्याची चित्र दिसत आहेत.  जिल्ह्यात सप्टेंबर अखेरीपासून भातपीक परिपक्व होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत तर जिल्ह्यातील सुमारे ७५ टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात कापणी करता आलेली नाही. अनेक शेतकऱ्यांचे भातपीक पावसामुळे जमिनीवर आडवे झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत होता. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) काही भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. परंतु सकाळपासून पावसाने चांगली उघडीप दिली होती. त्यामुळे पाऊस पडला तरी तो सायंकाळी उशिरा पडेल, अशी शक्यता गृहीत धरून आता जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे.  विजयादशमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली नाही, परंतु शनिवारी सकाळपासून भात कापणीला चांगलीच गती आली आहे. संपूर्ण शेतीशिवारे शेतकऱ्यांनी गजबजली असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी लवकरात भात कापणी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT