milk
milk  
मुख्य बातम्या

दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ बागडे

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच वाटचालीत दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्याचे देणे लागत या भावनेतून ८० टक्‍क्‍यांपर्यंतची रक्‍कम उत्पादकाला कशी मिळेल, या भावनेतून काम केल्याने दूध संघ उभा राहिला. थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे देत आहोत. काम अधिकाधिक पारदर्शी कसे होईल हा प्रयत्न आहे. त्याचाच परिपाक म्हणून दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ करता आली, औरंगाबाद दूध संघाचे अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांनी सांगितले. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गांधेली येथील दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाचे सोमवारी (ता. २७) थाटात उद्‌घाटन राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष व दूध संघाचे अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे होते. कार्यक्रमाला आमदार उदयसिंग राजपूत, बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष दामूअण्णा नवपूते, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत पी. मोहड, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध जे. बी. गुट्टे, एन.डी.डी.बी.चे प्रादेशिक संचालक ए. के. हातेकर, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळे, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. १९६० ला स्थापन झालेला औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे रूप आता बदलले आहे. आधुनिकतेची कास संघाने धरली आहे. गांधेली येथील दुग्धशाळेची हाताळणी क्षमता आता १ लाख लिटर झाली आहे, अशी माहिती श्री. काळे यांनी प्रास्ताविकातून दिली.  दूध संघाला सर्वतोपरी सहकार्य : मंत्री भुमरे जिल्हा दूध संघाची वाटचाल जवळून पाहण्याचा योग आपल्याला आला. आधीचा दूध संघ व आत्ताचा आधुनिकतेचा स्वीकार केलेला दूध संघ पाहता बदल घडविण्याची किमया संघाचे अध्यक्ष आमदार बागडे नाना यांनी करून दाखविली. दूध संघाच्या एकूणच कामात सर्वतोपरी सहकार्याची भूमिका आपली राहील, असे आश्वासन फलोत्पादन व रोजगार मंत्री संदीपान भुमरे पाटील यांनी दिले.   प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • विस्तारीकरणामुळे प्रकल्पाची क्षमता झाली दुप्पट
  • दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी अत्याधुनिक मशिनरीची उभारणी
  • स्वयंचलित दुग्धशाळा व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती.
  • पदार्थांचा दर्जा उत्तम ठेवण्यावर अधिक भर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT