Hapus
Hapus  
मुख्य बातम्या

चक्रीवादळाने हापूसची वाताहत

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः तौक्ते चक्रीवादळामुळे शेवटच्या टप्प्यातील हापूस हंगामाची वाताहात झाली. उरलासुरला माल काढून बाजारात पाठविण्याची बागायतदारांची लगबग सुरु आहे. अनेक बागायतदारांनी माल संपल्याचे जाहीरही करुन टाकले. सध्या वाशी बाजारात जिल्ह्यातून दररोज आंब्याच्या तीन हजार पेटीच जात आहेत. एरवी या काळात १५ ते २० हजार पेटी आंबा जात होता.

हवामान बदलांच्या परिणामामुळे यंदाचा हंगाम सुरवातीपासूनच अडचणीत होता. पाऊस लांबला, अपेक्षित थंडी नव्हती यामुळे मोहोर उशिराने आला. हंगाम एक महिना उशिराने सुरु झाला. मार्च महिन्यात उत्पादन हाती आले नाही. दर वधारलेले असले तरीही आंबाच नसल्यामुळे विकायचे काय, असा प्रश्‍न होता. या परिस्थितीत मार्गक्रमण करणाऱ्या बागायतदाराला शेवटच्या टप्प्यात चांगले पीक मिळेल, अशी आशा होती. 10 मे नंतर तशी स्थितीही होती. स्थानिक बाजारात सर्वसाधारण दरही चांगला मिळत होता. अनेकांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोचवण्यासाठी पावलेही उचलली होती.

हे सगळे सुरु असतानाच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने बागायतदारांचा घात केला. झाडावरील आंबा गळून गेला, झाडेच्या झाडे उन्मळून पडली. वेगवान वाऱ्याचा मार सहन करत आंबा शिल्लक राहिला होता; तो पावसाळी वातावरणामुळे अडचणीत आला. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाशी बाजारात सरासरी 15 ते 20 हजार पेटी आंबा जातो. 30 मे पर्यंत एवढी पेटी दरवर्षी येत असते. पुणे, कोल्हापूर येथेही काही प्रमाणात आंबा जातो. यंदा चित्र पलटले असून रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी फळ बाजारात सरासरी तीन हजार पेटीच पाठवली जात आहे. उर्वरित ठिकाणीही पेट्या जाण्याचे प्रमाण घटले आहे. अखेरच्या टप्प्यात पाच डझनच्या पेटीचा दर 1500 ते 2000 रुपये आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ते प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनच कमी आले होते; मात्र स्थानिक बाजारात हापूसचा दर टिकून होता. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला. वाशी बाजार समितीमध्ये येणाऱ्या एकूण मालापैकी चाळीस टक्के निर्यात केला जातो. यंदा मालच कमी आल्यामुळे निर्यातीत मोठी घट झाली आहे. कोरोनामुळे अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला निर्यात होऊ शकली नाही. तसेच विमान वाहतुकीचे दरही दुप्पट झाल्यामुळे निर्यातदारांमध्ये उत्सुकता नव्हती. काही प्रमाणात युरोप, यूएस आणि आखाती देशात हापूस निर्यात झाला. प्रतिक्रिया शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्याला थोडे फार पैसे मिळाले असते. गतवर्षी कोरोनामुळे झालेला परिणाम यंदा काही अंशी भरुन निघाला असता. मात्र वादळाने ते हिरावून घेतले. - संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती

वादळामध्ये आंबा वाया गेला आहे. यंदा उत्पादनच कमी आल्यामुळे शेवटच्या टप्प्यासाठी म्हणावा तेवढा आंबा शिल्लक नाही. काही बागायतदारांचे कामही थांबले आहे. - प्रसन्न पेठे, बागायतदार, रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : कोल्हापुरात वळवाच्या पावसाने भाजीपाला, आंबा बागांना फटका

Animal Disease : जनावरांतील चयापचयाचे आजार

Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी

12th (HSC) Result : १२ वीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के! कोकणाची बाजी, सर्वात कमी निकाल मुंबईचा

Agriculture Produce : केंद्र सरकार शेतमालाच्या परराज्य खरेदी-विक्रीसाठी करणार कायदा ?

SCROLL FOR NEXT