डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबून
डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबून 
मुख्य बातम्या

डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबून

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  : नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी कडाक्याचे ऊन आणि ढगाळ वातावरण, अशी स्थिती होती. त्याचा परिणाम आंबा पालवीच्या प्रक्रियेवर झाला असून पहिल्या टप्प्यात मुबलक मिळणाऱ्या आंबा उत्पादनाला मुकावे लागण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे. मात्र तज्ज्ञ संशोधकांनी डिसेंबर महिन्यातील अखेरपर्यंत पालवीची स्थिती काय राहील, यावरच हंगामातील चित्र अवलंबून असल्याचे स्पष्ट केले आहे. सप्टेंबर महिन्यात परतणारा मोसमी पाऊस यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत पडतच होता. त्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित थंडीच पडली नाही. डिसेंबर सुरु होत आला तरीही अजून थंडीचा पत्ता नाही. झाडांना आलेली पालवी अजूनही जून झालेली नाही. प्रक्रिया लांबणार असल्याने लवकर तयार होणारा आंबा, यंदा उशिरा तयार होईल. पालवी फुटलेली झाडे जून होणार,  त्यानंतर मोहोर येणार तोपर्यंत उशिरा झालेला असेल. हे सर्व गणित पुढील तीन महिन्यातील हवामानावर अवलंबून राहणार आहे. मोहोर आल्यानंतर फळ परिपक्व होण्यासाठी दोन ते अडीच महिने लागतात. त्यासाठी एप्रिलचा अर्धा महिना उजाडेल अशी सध्याची परिस्थिती आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदा वातावरणातील बदलांचा परिणाम आंबा हंगामावर झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ज्या पद्धतीने परतीच्या पावसाचा शेतीवर परिणाम झाला आहे. त्याच पद्धतीने कोकणातील हापूसला फटका बसू शकतो. याबाबत रत्नागिरीतील आंबा बागायतदार तुकाराम घवाळी म्हणाले, यंदा उशिरापर्यंत राहिलेल्या पावसाचे परिणाम संवेदनशील हापूसवर होत आहेत. प्रत्यक्षात उत्पादन केव्हा हाती येईल हे सांगणे अशक्य आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे पालवीवरच तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक कीडनाशकाची फवारणी केली आहे. पूर्वी मोहोरलेल्या झाडांवर खार पडत होती, आता पालवीवरच खार पडली आहे. प्रतिक्रिया... पुढील आठवडाभर आठवडाभर वातावरण कसे राहील याचा अभ्यास करुनच पुढील निरीक्षणे नोंदवता येतील. डिसेंबर महिन्याअखेरीस हंगामाचे चित्र सांगता येतील. या कालावधीत मोहोर किती बाहेर आला, फ्लॉवरींग किती झाले  यावर हंगाम कसा राहीले हे सांगू शकतो.  - डॉ. पराग हळदणकर, संशोधक,  कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT